शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग एस टी विभाग सज्ज, परतीच्या प्रवासासाठी जादा सात गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 4:15 PM

गणेशोत्सवासाठी मुंबई तसेच इतर भागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्या भविकांच्या सेवेसाठी एस.टी. सज्ज झाली आहे. जिल्हा अंतर्गत वाहतुकीबरोबरच परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्ग विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग एस टी विभाग सज्ज, परतीसाठी जादा सात गाड्याऑनलाईन बुकिंग सुरु : प्रकाश रसाळ यांची माहिती 

कणकवली : गणेशोत्सवासाठी मुंबई तसेच इतर भागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्या भविकांच्या सेवेसाठी एस.टी. सज्ज झाली आहे. जिल्हा अंतर्गत वाहतुकीबरोबरच परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्ग विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. मुंबईतील विविध भागात जाण्यासाठी सात जादा गाड़यांची सोय करण्यात आली असून त्यांचे ऑनलाईन बुकिंग सूरू झाले आहे.अशी माहिती एस.टी.चे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली.येथील विभागीय कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी अभिजीत पाटील तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रकाश रसाळ म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी अनेक भाविक मुंबई, पुणे आदी भागातून येत असतात.

परतीचा प्रवास करताना त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून एस टी प्रशासनाने नियोजन केले आहे. 18 ते 23 ऑगस्ट या कालावधीत मुंबईच्या विविध भागात सिंधुदूर्गातील विविध आगारातून सात जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये विजयदुर्ग - बोरीवली सायंकाळी 4 वाजता, सावंतवाड़ी -बोरीवली दुपारी 3.30 वाजता, कणकवली - बोरीवली सायंकाळी 5 वाजता, कणकवली - मुंबई सायंकाळी 4 वाजता, फोंडा- बोरीवली सायंकाळी 5 वाजता, देवगड - बोरीवली दुपारी 3.30 वाजता व सायंकाळी 4.45 वाजता . या गाड्यांचा समावेश आहे.या जादा गाडयांचे आरक्षण सुरु झाले असून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. या गाडयांचे आरक्षण फुल्ल झाल्यानंत्तर आणखीन जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसे नियोजन करण्यात आले आहे.गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांमुळे एस.टी.च्या जिल्हाअंतर्गत सेवा देणाऱ्या गाडयाना गर्दी असते. ही बाब लक्षात घेऊन चांगले भारमान असलेल्या मार्गावर जादा गाड्या सोडण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. भविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न असल्याचेही प्रकाश रसाळ यांनी यावेळी सांगितले.ते पुढे म्हणाले, ठाणे येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी आतापर्यन्त 61 गाडयांचे बुकिंग झाले असून या गाड़यांची संख्या आणखिन वाढणार आहे. मुंबईच्या इतर भागातूनहि गाडयांचे आरक्षण झाले आहे.त्यांचा नेमका आकड़ा येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल.असेही ते यावेळी म्हणाले.प्रवाशांच्या मागणीनुसार गाड़यांची सोय !परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार गाड़यांची सोय करण्यात येणार आहे. प्रवाशानी मागणी केल्यास त्यांच्या विशिष्ट गावातून अथवा वाडीतून ग्रुप बुकिंग द्वारे गाडी उपलब्ध करून दिली जाईल. असेही प्रकाश रसाळ यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवstate transportराज्य परीवहन महामंडळ