शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

सिंधुदुर्ग : कणकवलीत महामार्गाच्या कामाने घेतला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 12:22 IST

भूसंपादन मोबदला वाटप प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे.

ठळक मुद्देकणकवलीत महामार्गाच्या कामाने घेतला वेग ; उड्डाणपुलाला आली गतीतालुक्यात 407 कोटींचा भूसंपादन मोबदला वाटप

सुधीर राणेकणकवली : मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कणकवली तालुक्यातील 22 महसुली गाव बाधित होत आहेत . भूसंपादन मोबदला वाटपासाठी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयाकडे प्राप्‍त झालेल्या 591 कोटी रकमेपैकी गेल्या 6-7 महिन्यांत 407 कोटी रुपयांचे वाटप आतापर्यंत पूर्ण झाले आहे. तर उर्वरित भूसंपादन मोबदला वाटप प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे.मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामाला आता वेग आला आहे. अनेक ठिकाणी सर्व्हिस रोड तयार करुण वहातुक त्या मार्गावरुन वळविण्यात आली आहे. कणकवली शहरात उडडाणपूलाच्या कामाने वेग घेतला आहे. हॉटेल सह्याद्री ते नरडवे नाका परिसरातील काही पिलरचे पाया भरणीचे काम झाले असून उर्वरित काम प्रगती पथावर आहे. तर इतर ठिकाणी पिलरसाठी खड्डे खोदले जात आहेत.कणकवली तालुक्यात भूसंपादन मोबदला वाटप प्रक्रिया गतीने राबविण्यात येत आहे. तालुक्यातील हुंबरट, उत्तर-दक्षिण गावठाण, खारेपाटण, संभाजीनगर, कलमठ, नडगिवे, नांदगाव, काजिर्डे, बेळणे, असलदे, साळिस्ते, औदुंबरनगर, आनंदनगर, वारगाव, तळेरे, नाग सावंतवाडी, जानवली, जांभळगाव, ओसरगाव, हळवल, कणकवली आणि वागदे अशा 22 गावांमधील जमीन महामार्गामध्ये बाधित झाली आहे. या भूसंपादन मोबदल्यापोटी आतापर्यंत सुमारे 406 कोटी 85 लाख 57 हजार 169 एवढी रक्‍कम म्हणजेच जवळजवळ 85 टक्के रक्‍कम वाटप करण्यात आली आहे.या 22 गावांची अ‍ॅवॉर्ड रक्‍कम 479 कोटी 23 लाख 32 हजार 492 एवढी आहे. हुंबरटमध्ये आतापर्यंत 90 टक्के, उत्तर गावठाणमध्ये 89 टक्के, खारेपाटणमध्ये 74 टक्के, संभाजीनगरमध्ये 89 टक्के, कलमठमध्ये 80 टक्के, नडगिवेमध्ये 91 टक्के, नांदगावमध्ये 90 टक्के, काजिर्डेमध्ये 99 टक्के, बेळणेमध्ये 94 टक्के, असलदे 90 टक्के, साळीस्ते 92 टक्के, औदुंबरनगर 88 टक्के, आनंदनगर 83 टक्के, वारगांव 97 टक्के, तळेरे 85 टक्के, नाग सावंतवाडी 90 टक्के, जानवली 85 टक्के, जांभळगाव 90 टक्के, ओसरगाव 87 टक्के, हळवल 99 टक्के, कणकवली 58 टक्के आणि वागदे 64 टक्के अशी एकूण अ‍ॅवॉर्ड रक्‍कमेच्या 85 टक्के रक्‍कम वाटप करण्यात आली आहे.

प्रकल्पग्रस्तांना ज्या प्रकरणांबाबत आक्षेप आहेत किंवा जी प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत, त्याबाबत लवादाकडून निकाल लागल्यानंतर वाटप प्रक्रिया होणार आहे. जसजशी प्रकरणे निकाली निघत आहेत, तसतसा भूसंपादन मोबदला वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या महामार्गाचे काम जोरदार सुरु असून कणकवली तसेच इतर परीसराचा चेहरा मोहराच बदलला आहे.महामार्गाच्या कामामुळे पूर्वीपासून ओळखिची ठिकाणे, खुना, झाडे नष्ट झाली आहेत. त्यामुळे रात्रिच्यावेळी बऱ्याच दिवसा नंतर कणकवली तसेच इतर परिसरात आलेल्या लोकांना त्यांना हवे असलेले ठिकाण शोधताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महामार्गा लगतचे पूर्वीचे फलक गायब झाले आहेत. त्यामुळे बाहेर गावाहुन कणकवलीत आलेल्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.ओळखीची ठिकाणे झाली नष्ट !महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामुळे कणकवलीतील अनेक आमच्या ओळखिची ठिकाणे नष्ट झाली आहेत. सहा महिन्यापूर्वी असलेले दूकान आता त्या ठिकाणी नसल्याने त्याचा शोध घेताना खूप त्रास सहन करावा लागत आहे. अशी प्रतिक्रिया कणकवली येथील मूळ रहिवासी असलेले पण सध्या मुंबई येथे रहात असलेले अभिजीत सावंत यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग