सिंधुदुर्ग : मनविसे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुखपदी शैलेश श्रुंगारे, नूतन पदाधिकारी निवड जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 12:47 IST2018-10-31T12:45:23+5:302018-10-31T12:47:13+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी शनिवारी जाहीर करण्यात आल्या. मनसे प्रमुख राज ठाकरे, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत मनविसे जिल्हा संपर्कप्रमुखपदी शैलेश श्रुंगारे यांची निवड करण्यात आली आहे.

कणकवली येथे मनविसे जिल्हा संपर्कप्रमुख शैलेश श्रुंगारे यांचा मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राजन दाभोलकर, अमित इब्रामपूरकर, अनिल राणे, शैलेश नेरकर आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी शनिवारी जाहीर करण्यात आल्या. मनसे प्रमुख राज ठाकरे, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत मनविसे जिल्हा संपर्कप्रमुखपदी शैलेश श्रुंगारे यांची निवड करण्यात आली आहे.
वैभववाडी संपर्कप्रमुखपदी गौरव राणे, देवगड संपर्कप्रमुखपदी समीर आडकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष समीर राऊळ, संपत मयेकर यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. या नूतन पदाधिकाऱ्यांचा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, मनविसे जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, उपाध्यक्ष अनिल राणे, कणकवली शहराध्यक्ष शैलेश नेरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते़. नूतन पदाधिकाऱ्यांमध्ये सावंतवाडी मनविसे तालुका सचिव रामा देवळी, शहर सचिव शुभम घावरे, उपशहराध्यक्ष ओंकार कुडतरकर, माडखोल विभागअध्यक्ष कृष्णा गावडे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची निवडही यावेळी करण्यात आली.