सिंधुदुर्ग : बांदा पोलिस वसाहतीची दूरवरस्था, पाहण्यास आमदारांना वेळ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 14:21 IST2018-09-19T14:17:51+5:302018-09-19T14:21:23+5:30
बांदा पोलीस निवास वसाहतीची स्थिती भयानक झाली आहे. या पोलिस वस्तीकडे पाहण्यास आमदार नीतेश राणे यांना वेळ नाही. भेट देण्यासही नकार दिला. तर उलट हा विषय गृहराज्यमंत्री यांचा आहे. असे सांगून राणे तातडीने निघुन गेले, या प्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बांदा पोलीस निवासी वसाहत चाळीची स्थिती भयानक झाली आहे. (छाया अजित दळवी)
बांदा : बांदा पोलीस निवास वसाहतीची स्थिती भयानक झाली आहे. या पोलिस वस्तीकडे पाहण्यास आमदार नीतेश राणे यांना वेळ नाही. भेट देण्यासही नकार दिला. तर उलट हा विषय गृहराज्यमंत्री यांचा आहे. असे सांगून राणे तातडीने निघुन गेले, या प्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आमदार नीतेश राणे यांना पोलिसांच्या निवासस्थान चाळीची पहाणी करण्यास सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी विनंती केली.(छाया अजित दळवी)
बांदा येथे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियोजित पाईपलाइनची पाहणी करण्यासाठी राणे आळवाडी तेरोखोल नदी येथे आले होते. तेरोखोल नदी ते पोलिस स्थानक यातील अंतर अवघे ५० मिटर होते. त्यावेळी कार्यक्रम संपल्यानंतर कल्याणकर यांनी पोलिसांच्या निवासस्थान चाळीची पाहणी करण्यास विनंती केली होती.
बांदा गावात पूर्वी आदिलशाही होती परंतु पोलिसांची स्थानकाची जागा व परिसर हा उंचीची वखार म्हणून प्रसिद्ध आहे. येथे देव पाटेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या खालिल बाजूस बालोउद्यान. पोलिस स्टेशन व अधिकारी यांचे निवासस्थान आहे. परंतु पोलिसांच्या निवासस्थान चाळीची भग्नाअवस्था झाली आहे. मागच्या ३ लाईन तर पूर्णपणे मोडकळीस आलेल्या आहेत. त्यात झाडे वाढलेली आहेत. उपनिरीक्षक यांचा बंगला राहण्यास योग्य नाही. त्यामुळे त्यांनाही सावंतवाडीत रहावे लागते.
काम सर्व जनतेला कुठल्याही कामासाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक वेळी अवेळी, रात्री अपरात्री पोलिसांची मदत हवी असते व मदत घेत असतो. आपली कामे करून घेत असतो. जर त्यांच्याकडे चांगल्या कामाची आपण अपेक्षा करत असू तर त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.
ग्रामपंचायतीला दिले पत्र
आपल्या गावाची सेवा करणाऱ्या पोलिसांसाठी अशी रास्त मागणी करणे हे आपले कर्तव्य व जबाबदारी आहे. तेव्हा शासनाकडे या सर्व चाळी तत्पर दुरुस्त करणेची मागणी करणे. गावाच्या सौंदर्यात वाढ करण्यासाठी पोलीस लाईनसाठी व परिसराची सुधारणा करावी अशी मागणी कल्याणकर यांनी ग्रामपंचायत कार्यालय बांदा येथे पत्रकाद्वारे केली आहे.