सिंधुदुर्ग : शेतमळ्यातील दारूसाठ्यावर छापा, मालवण पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 17:36 IST2018-10-15T17:33:24+5:302018-10-15T17:36:35+5:30
मालवण शहरातील रेवतळे येथील शेततळ्यात लपवून ठेवलेल्या गोवा बनावटीच्या दारू साठ्यावर मालवण पोलिसांनी छापा टाकला. यात सुमारे ४२ हजार रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली. उत्कर्ष प्रभात मांजरेकर (२४) असे दारूसाठा करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही कारवाई रविवारी रात्री १० वाजता केली.

सिंधुदुर्ग : शेतमळ्यातील दारूसाठ्यावर छापा, मालवण पोलिसांची कारवाई
सिंधुदुर्ग : मालवण शहरातील रेवतळे येथील शेततळ्यात लपवून ठेवलेल्या गोवा बनावटीच्या दारू साठ्यावर मालवण पोलिसांनी छापा टाकला. यात सुमारे ४२ हजार रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली. उत्कर्ष प्रभात मांजरेकर (२४) असे दारूसाठा करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही कारवाई रविवारी रात्री १० वाजता केली.
शहरातील रेवतळे येथील शेतमळ्यात उत्कर्ष मांजरेकर याने गोवा बनावटीचा दारूचा अवैधरित्या साठा करून ठेवला होता. याबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी योगेश जळवी, सूरजसिंग ठाकूर, हरिश्चंद्र जायभाय, प्रसाद आचरेकर, मंगेश माने, सिद्धेश चिपकर, रमेश तावडे, पुजाली निकम यांच्या पथकाने रविवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान छापा टाकला. याप्रकरणी उत्कर्ष मांजरेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.