शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

सिंधुदुर्ग : गृहराज्यमंत्र्यांचा निषेध, मराठा आंदोलनावेळी खोटे गुन्हे : मालवण पंचायत समिती मासिक सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 4:31 PM

मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत स्वाभिमानच्या दहा तर शिवसेनेच्या एका सदस्याने गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांचा निषेधाचा ठराव मांडला.

ठळक मुद्देगृहराज्यमंत्र्यांचा निषेध, मराठा आंदोलनावेळी खोटे गुन्हे मालवण पंचायत समिती मासिक सभेत निषेधाचा ठराव

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. मात्र पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याने मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत स्वाभिमानच्या दहा तर शिवसेनेच्या एका सदस्याने गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांचा निषेधाचा ठराव घेतला. हा निषेधाचा ठराव सुनील घाडीगावकर यांनी मांडला.दरम्यान, मालवणात वीज वितरण, दूरसंचार, सार्वजनिक बांधकाम या तीन प्रमुख विभागांचा कारभार मनमानीपणाचा होत आहे. याठिकाणी कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना मराठीही नीट येत नाही. त्यामुळे अनेक महिने तक्रारी प्रलंबित राहिलेल्या आहेत. याला सर्वस्वी पालकमंत्री, खासदार, आमदार हे जबाबदार आहेत, असे सांगत लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेच्या निषेधाचाही ठराव घेण्यात आला.मालवण पंचायत समितीची मासिक सभा सभापती मनिषा वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीराजे सभागृहात झाली. यावेळी उपसभापती अशोक बागवे, गटविकास अधिकारी राजेंद्र्र कांबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय गोसावी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.यावेळी पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, विनोद आळवे, सागरिका लाड, सोनाली कोदे, राजू परूळेकर, गायत्री ठाकूर आदी सदस्यांनी आपल्या विभागातील समस्या सभागृहात मांडल्या.

देवबागमध्ये एका हॉटेलला बसविण्यात आलेल्या ट्रान्सफार्मरच्या चुकीच्या जोडणीमुळे गावातील अनेक ग्रामस्थांची विद्युत उपकरणे जळून लाखो रुपयांचे नुकसानझाले. या साऱ्या प्रकाराला वीज वितरण कंपनी जबाबदार असून बाजारभावाने ग्रामस्थांची नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणी मधुरा चोपडेकर यांनी केली.वीज कनेक्शन देण्यास टाळाटाळअसरोंडी येथील सुनील शेलार यांनी वीज वितरणकडे वीज जोडणीसाठी पैसे भरल्यानंतर आवश्यक असणारे वीज खांब व वीज वाहिन्यांची जोडणी करण्यात आली. मात्र गेले वर्षभर वीज कनेक्शन देण्यात आलेले नाही.

लगतच्या ग्रामस्थांचा विरोध असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र जर वीज खांब उभारताना विरोध झाला नाही तर मग आता कनेक्शन देताना कसल्या अडचणी? असा संतप्त सवाल सुनील घाडीगावकर यांनी उपस्थित करत आचरा वीज वितरण विभागाच्या कामकाजावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्ग