शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

सिंधुुदुर्ग :  नाबर प्रशालेत संपूर्ण कारभार महिलांच्या हाती, विभागप्रमुखांपासून शिपायांपर्यंत महिलाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 5:04 PM

बांदा (सिंधुुदुर्ग) येथील व्ही. एन. नाबर प्रशालेच्या शिक्षिका बांदा येथील अग्रणी असलेल्या या शाळेचा संपूर्ण कारभार हा महिलाच सांभाळत आहेत. मुख्याध्यापिका तसेच सर्व विभागाच्या प्रमुखांपासून ते थेट शिपायांपर्यंत या प्रशालेत महिलाराज आहे. नियोजनबद्धरित्या या शाळेचा कारभार चालविला जात असून शाळेची शैक्षणिक प्रगतीही वाखाणण्याजोगी आहे.

ठळक मुद्दे बांदा येथील नाबर प्रशालेत संपूर्ण कारभार महिलांच्या हातीविभागप्रमुखांपासून शिपायांपर्यंत महिलाराजशैक्षणिक प्रगती वाखाणण्याजोगी : मुख्याध्यापिका

निलेश मोरजकर

सिंधुुदुर्ग : बांदा येथील व्ही. एन. नाबर प्रशालेच्या शिक्षिका बांदा येथील अग्रणी असलेल्या या शाळेचा संपूर्ण कारभार हा महिलाच सांभाळत आहेत. मुख्याध्यापिका तसेच सर्व विभागाच्या प्रमुखांपासून ते थेट शिपायांपर्यंत या प्रशालेत महिलाराज आहे. नियोजनबद्धरित्या या शाळेचा कारभार चालविला जात असून शाळेची शैक्षणिक प्रगतीही वाखाणण्याजोगी आहे.२२ वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळाने स्थापन केलेली ही शाळा आता श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्टने आपल्या ताब्यात घेतली आहे. मंगेश कामत यांनी ५ कोटींहून अधिक रक्कम खर्च करून संपूर्ण शाळेचा कायापालट केला आहे. प्रशालेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या आहेत.शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा कोरगावकर या संपूर्ण शाळेची जबाबदारी सांभाळतात. नर्सरीपासून दहावीपर्यंतचे वर्ग या शाळेत असून, बांदा दशक्रोशीतील ४६६ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. मुख्याध्यापिका कोरगावक यांनी विभागवार समित्यांची स्थापना करून प्रत्येक समितीकडे कामांचे नियोजन देण्यात आले आहे. त्याप्रमाणे शाळेचे संपूर्ण प्रशासन चालविण्यात येते.

पूर्व प्राथमिक विभागाची जबाबदारी चित्रलेखा नाईक, प्राथमिक विभागाची जबाबदारी हेलन रॉड्रिग्स यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. उपमुख्याध्यापिका रसिका वाटवे या प्रशासकीय कामात शिल्पा कोरगावकर यांना सहकार्य करतात. विज्ञान विभागाच्या प्रमुख म्हणून स्नेहा नाईक, आयबीटी व सांस्कृतिक विभागप्रमुख म्हणून रिना मोरजकर, संगणक विभागप्रमुख म्हणून धनश्री मुंगी, ग्रंथपाल म्हणून प्रीती पेडणेकर आपली जबाबदारी चोखपणे सांभाळत आहेत. क्रीडा विभागाची जबाबदारी सुमित्रा सावंत यशस्वीपणे सांभाळत आहेत.

मैदानी, सांघिक खेळांमध्ये शाळेचे प्रतिनिधीत्वदैनंदिन अभ्यासाबरोबरच प्रशालेत शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात. विविध स्पर्धा व मैदानी खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी विभाग, राज्यपातळीवर व देशपातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. या शाळेचे अनेक विद्यार्थी हे मैदानी व सांघिक खेळांमध्ये शाळेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. वक्तृत्व स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी तालुका व जिल्हास्तरावर अनेक पारितोषिके मिळविली आहेत. प्रशालेत ५0 रुपयांचा अत्याधुनिक संगणक कक्ष असून या कक्षाची जबाबदारी धनश्री मुंगी सांभाळत आहेत.शाळेच्या कार्याबद्दल गौरवोद्गाररोजच्या अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाची जोड मिळावी यासाठी आय.बी.टी. तंत्रशिक्षण विषय प्रशालेत सुरू केला आहे. इंग्रजी माध्यमाचा हा विषय सुरू करणारी व्ही. एन. नाबर ही महाराष्ट्रातील पहिलीच शाळा असून प्रमुखपदाची जबाबदारी रिना मोरजकर सांभाळत आहेत.

या आय. बी. टी. च्या माध्यमातून कित्येक विद्यार्थी तंत्रशिक्षणात पारंगत झाले आहेत. अल्पावधीतच केलेल्या शैक्षणिक प्रगतीमुळे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व शासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शाळेचे कौतुक केले आहे. प्रशालेला आतापर्यंत देश, विदेशातील अनेक शास्त्रज्ञ व मान्यवरांनी भेट देत शाळेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.

बांदा येथील व्ही. एन. नाबर प्रशालेतील महिला शिक्षिका व कर्मचारी वर्ग.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८sindhudurgसिंधुदुर्गSchoolशाळा