शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
2
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
3
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
4
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
5
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
6
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
7
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
8
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
9
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
10
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
11
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
12
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
13
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
14
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
15
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
16
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
17
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
18
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
19
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
20
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव

सिंधुदुर्ग : मालवणात जानेवारीत शतक महोत्सवाची धूम, पालिकेकडून रूपरेषा जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 10:59 AM

मालवण नगरपरिषदेला यावर्षी शंभर वर्षे होत आहेत. यानिमित्त मालवण नगरपरिषद आणि आमदार वैभव नाईक यांच्या संयुक्त विद्यमाने २५, २६, आणि २७ जानेवारी रोजी शतक महोत्वाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसीय महोत्सवात सिनेस्टार, सेलिब्रिटी, नावाजलेले गायक यांच्यासह स्थानिक कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल अनुभवता येणार आहे.

ठळक मुद्देमालवणात जानेवारीत शतक महोत्सवाची धूम, पालिकेकडून रूपरेषा जाहीर सांगता समारंभासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रण, महेश कांदळगावकर यांची माहिती

सिंधुदुर्ग : मालवण नगरपरिषदेला यावर्षी शंभर वर्षे होत आहेत. यानिमित्त मालवण नगरपरिषद आणि आमदार वैभव नाईक यांच्या संयुक्त विद्यमाने २५, २६, आणि २७ जानेवारी रोजी शतक महोत्वाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसीय महोत्सवात सिनेस्टार, सेलिब्रिटी, नावाजलेले गायक यांच्यासह स्थानिक कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल अनुभवता येणार आहे. शतक महोत्सव सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.मालवण नगरपरिषदेची स्थापना १९१८ साली करण्यात आली होती. २०१७ पासून शहरात पालिकेच्या शतक महोत्सवानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम राबविले गेले. शतक महोत्सवी वर्षाची सांगता २७ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली तर आमदार वैभव नाईक यांनीही पाच लाखाचा निधी पालिकेला हस्तांतरित केला आहे.यानिमित्त नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महोत्सवाची रूपरेषा जाहीर केली. यावेळी मुख्याधिकारी रंजना गगे, बांधकाम सभापती सेजल परब, नगरसेवक सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, नितीन वाळके, पंकज साधये, आकांक्षा शिरपुटे, तृप्ती मयेकर आदी उपस्थित होते.२५ रोजी महोत्सवाचा शुभारंभ केला जाणार आहे. २६ रोजी स्थानिक कलाकारांना प्राधान्य देण्यासाठी मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांसाठी खेळ पैठणीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याची जबाबदारी महिला नगरसेविकांवर देण्यात आली आहे.शतक महोत्सवाची २७ जानेवारी सांगता होणार आहे. त्यानंतर पालिकेच्या शंभर वर्षाच्या इतिहासात नगराध्यक्ष, नगरसेवक पद भूषविलेल्या आजी-माजी व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच पालिकेच्या शंभर वर्षांची यशोगाथेचे दर्शन घडविणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे, असे कांदळगावकर यांनी सांगितले.भाजप नगरसेवकांची पाठशतक महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या पत्रकार परिषदेत भाजप-शिवसेना युतीच्या गटात फूट असल्याचे प्रकर्षाने जाणवले. नगराध्यक्षांच्या साथीला शिवसेना नगरसेवक व विरोधी गटाचे दोन नगरसेवक होते. मात्र भाजपचे उपनगराध्यक्ष व गटनेते पालिकेत असताना पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते. कांदळगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले असतानाही भाजपच्या नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. सेजल परब यांनी महोत्सवासाठी सर्वांनी एकत्र यायलाच हवे, अशी भूमिका मांडली.

टॅग्स :Malvan beachमालवण समुद्र किनाराsindhudurgसिंधुदुर्ग