शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

सिंधुदुर्ग : गावाच्या विकासासाठी आदर्श सरपंच बनावे : विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 1:45 PM

गावाचा विकास करताना सरपंचांनी कॉन्ट्रॅक्टर सरपंच न बनता आदर्श सरपंच बनावे. आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा योग्य वापर करून गावाचा झपाट्याने विकास करावा, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी सरपंच-उपसरपंच मार्गदर्शन कार्यशाळेत केले. शरद कृषी भवन येथे शिवसेना पक्षाच्यावतीने आयोजित शिबिराचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देगावाच्या विकासासाठी आदर्श सरपंच बनावे : विनायक राऊतओरोस येथील सरपंच, उपसरपंच मार्गदर्शन कार्यशाळेत आवाहन

सिंधुदुर्गनगरी : गावाचा विकास करताना सरपंचांनी कॉन्ट्रॅक्टर सरपंच न बनता आदर्श सरपंच बनावे. आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा योग्य वापर करून गावाचा झपाट्याने विकास करावा, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी सरपंच-उपसरपंच मार्गदर्शन कार्यशाळेत केले.शरद कृषी भवन येथे शिवसेना पक्षाच्यावतीने आयोजित शिबिराचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, गटनेते नागेंद्र परब उपस्थित होते.खासदार राऊत म्हणाले, शासनाने आता गावाच्या विकासाची संपूर्ण धुरा सरपंचांवर सोपविली आहे. त्यामुळे गावाचा विकास करण्यासाठी सरपंचांना असलेले अधिकार याची त्यांना माहिती मिळावी, हे अधिकार कशाप्रकारे वापरावेत याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी हे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. त्यामुळे हे शिबिर लोकप्रतिनिधींना दिशादर्शक असे ठरणार आहे.

ग्रामपंचायतीला आता मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. हा सर्व निधी खर्च करण्याची सर्वश्री जबाबदारी सरपंच यांचीच आहे. मात्र ही जबाबदारी पार पाडत असताना सरपंचांनी कॉन्ट्रॅक्टर न बनता ह् आदर्श सरपंच बनावे, असे आवाहन राऊत यांनी केले. तसेच ग्रामसेवकांवर अवलंबून न राहता या मार्गदर्शन शिबिरातून अधिकारांची माहिती घेऊन गावाचा विकास करावा.आमदार वैभव नाईक म्हणाले, गावात काम करताना सरपंचांना त्यांचे अधिकार माहीत नसल्याने अनेक अडचणी येतात. त्यामुळे त्यांना काय करावे हे कळत नाही. परिणामी त्यांना ग्रामसेवकांवर अवलंबून रहावे लागते. मात्र या मार्गदर्शन शिबिरात सरपंचांना ग्रामपंचायतविषयक विविध मुद्यांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यांना अधिकारांची माहिती दिली जाणार आहे. या शिबिराचा लाभ घेऊन सरपंचांनी गावात विविध उपक्रम राबवावेत असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी ग्रामपंचायत अ‍ॅक्टमधील महत्त्वाच्या तरतुदीतील लेखासंहिता, ग्रामसभा, मासिक सभा, सरपंच, उपसरपंच यांचे अधिकार व कर्तव्ये यावर सुधीर बालम यांनी, आपला गांव आपला विकास, लोकसहभागाचे महत्त्व व त्यातून ग्रामविकास, ग्रामविकासातील प्रेरणास्त्रोत कार्यानुभव या विषयांवर भारत पाटील यांनी तर १४ वा वित्त आयोग व आपला गांव आपला विकास यावर नारायण परब यांनी मार्गदर्शन केले. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग