शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

सिंधुदुर्ग :ओसरगाव येथील आगीच्या घटनेची सखोल चौकशी करावी : उपरकर यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2018 2:11 PM

मुंबई -गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या ओसरगाव येथील डेपोला लागलेली आग ही संशयास्पद आहे. केवळ विम्याचे पैसे मिळावेत म्हणून ही आग लावल्याची दाट शक्यता आहे. असा आरोप करतानाच या आगीच्या घटनेची सखोल चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देओसरगाव येथील आगीच्या घटनेची सखोल चौकशी करावी परशुराम उपरकर यांची मागणी

कणकवली : मुंबई -गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या ओसरगाव येथील डेपोला लागलेली आग ही संशयास्पद आहे. केवळ विम्याचे पैसे मिळावेत म्हणून ही आग लावल्याची दाट शक्यता आहे. असा आरोप करतानाच या आगीच्या घटनेची सखोल चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाड़कर, शैलेंद्र नेरकर, मालवणकर आदी उपस्थित होते.परशुराम उपरकर म्हणाले, या ठेकेदार कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना तिन दिवस सुट्टी दिली होती. हे कर्मचारी परप्रांतीय असून ते आपल्या गावी तिन दिवसात जावून येऊ शकत नाहीत ही सत्यस्थिती आहे. आगीची घटना घडली त्याठिकाणी साधारणतः 2000 कर्मचारी रहातात. मात्र घटनेच्या वेळी एकही कामगार तिथे उपस्थित नव्हता.

या आग लागलेल्या डेपोत महामार्गाच्या कामासाठी लागणारी स्पोटके, डिझेल, ऑईल साठा करून ठेवण्यात आले होते असे आता समोर येत आहे. मात्र या कंपनीने ज्वालाग्राही पदार्थ ठेवण्याची परवानगी संबधित प्रशासनाकडून घेतलेली आहे का? हे तपासणे आवश्यक आहे. याठिकाणी 500 टायर ठेवले असल्याचे सांगण्यात येते. मात्र, फक्त 100 गाड्यांचीच नोंद उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे केलेली आहे. त्यामुळे टायर बाबतचा कंपनीचा दावा बोगस आहे.संबधित ठिकाणी कोणत्याही आग प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे आजुबाजूच्या गावातील लोकांना धोका निर्माण झाला होता. याचीही दखल घेणे आवश्यक आहे. बोर्डवे लगत असलेल्या क्रशरच्या ठिकाणी होणाऱ्या ब्लास्टिंग मुळे आजुबाजूच्या परिसरातील घराना तडे गेले आहेत. या क्रशरच्या जागेची तात्पुरती बिनशेती परवानगी घेतलेली आढळत नाही. त्यामुळे एक प्रकारे येथील काम अनधिकृतच सुरु आहे.पोलिसांनी ओसरगाव येथील आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमिवर टायरचे चलन , खरेदीची बिले, ओईलची बिले, स्पोटके साठवणुकीचा परवाना तपासण्याची गरज आहे. असे झाले तरच नेमके सत्य जनतेसमोर येईल.यापूर्वीही महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने बेळणे ते कासार्डे पर्यन्तचा रस्ता अनेक ठिकाणी पावसाने खचल्याचे सांगत 98 कोटी रुपयांच्या विम्याचा दावा केला होता. आमच्या जागरूकपणामुळे त्याना ही विम्याची रक्कम मिळालेली नाही. असाच प्रयत्न दिलीप बिल्डकॉन करीत असल्याचे प्राथमिक चित्र तरी आग प्रकरणामुळे दिसत आहे.सावंतवाड़ी तालुक्यातील सोनूर्ले येथील मायनिंग उत्खननामुळे तेथील ग्रामस्थाना त्रास सहन करावा लागत आहे. तेथील घराना तडे गेले आहेत. 2008 पासून परवाना घेता तिथे काम सुरु आहे. ओव्हरलोड वहातुक सुरु आहे. मात्र अधिकारी याची दखल घेताना दिसत नाहीत. ठेकेदार कंपन्यांनी अधिकाऱ्यांना आपल्या खिशात टाकल्यासरखी ही स्थिती आहे. त्यामुळे जनतेला कोणी वालीच उरलेला नाहीं असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग