शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

सिंधुदुर्ग : कणकवलीत महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ ; ८ प्रभागात मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 5:02 PM

स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ अभियान जनजागृतीसाठी कणकवलीत नगरपंचायतीच्यावतीने महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ नगरपंचयत कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर आमदार नितेश राणे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देकणकवलीत महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ ; ८ प्रभागात मोहिमकणकवलीचे नाव स्वच्छता अभियानातून उज्वल करा : नितेश राणे

कणकवली : प्रत्येक नागरिकाने घरासोबतच आपले शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आपल्या शहराचे 'स्वच्छता अभियान २०१९' मध्ये राज्यासह देशात नाव व्हावे यासाठी कणकवलीवासियांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेवून' स्वच्छ व सुंदर कणकवली 'बनवावी असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ अभियान जनजागृतीसाठी कणकवलीत नगरपंचायतीच्यावतीने महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ नगरपंचयत कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर आमदार नितेश राणे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी नगराध्यक्ष समिर नलावडे, मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, आरोग्य सभापती अ‍ॅड.विराज भोसले, महिला बालकल्याण सभापती मेघा गांगण, नगसेवक बंडू हर्णे,महेंद्र सांबरेकर,कविता राणे, प्रतिक्षा सावंत,उर्मी जाधव, ब्रँड अ‍ॅम्बेसिडर डॉ.विद्याधर तायशेटे,डॉ.राजेंद्र मुंबरकर,किशोर राणे,बंडू गांगण,संजय मालंडकर,रोटरी क्लब प्रेसिडेंट महेंद्र मुरकर, दिपल बेलवलकर, दादा कुडतरकर, अ‍ॅड.दिपक अंधारी, नितीन म्हापणकर, संतोष कांबळी,डॉ.विनय शिरोडकर आदी तसेच कणकवली महाविद्यालय , विद्यामंदिर हायस्कूल, एस.एम.हायस्कूल आणि आयडीयल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी, नगरपंचायत कर्मचारी या स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले होते.

यावेळी आमदार राणे पुढे म्हणाले, स्वच्छता मोहीम केवळ अभियानापुरती मर्यादीत न राहता ३६५ दिवस आपले शहर स्वच्छ रहावे. यासाठी विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनीही या मोहीमेत सहभागी होवून शहर स्वच्छतेसाठी खारीचा वाटा उचलावा असे आवाहनही त्यानी यावेळी केले.यावेळी नितेश राणे यांच्या हस्ते डिजीटल तंत्र स्क्रिनद्वारे स्वच्छताविषयीची डॉक्युमेंटरी कॅम्पेनचा शुभारंभ करण्यात आला. तसेच आमदार राणे यांनी स्वतः हातात खराटा घेत साफसफाई केली.यावेळी समिर नलावडे म्हणाले, कणकवली नगरपंचायतीकडून स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ अंतर्गत शहर स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविले गेले. यात शहरवासियांचा चांगला प्रतिसाद लाभला. तसेच स्वच्छ हॉस्पिटल, स्वच्छ हॉटेल, स्वच्छ शाळा, स्वच्छ वार्ड अशा स्पर्धाचे आयोजन केले आहे. यात सहभागी होवून आपले शहर देशात अव्वल येण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.मनोज उकिर्डे म्हणाले, स्वच्छतेत महिलांचा सहभाग अधिक असतो. त्यामुळे अभियानात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे तसेच शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होवून नगरपंचायतीला सहकार्य करावे.ब्रँड अ‍ॅम्बेसिडर डॉ.विद्याधर तायशेटे यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. तर बांधकरवाडी, शिवशक्तीनगर,साईनगर, वरचीवाडी, तेली आळी, हर्णेआळी, बिजलीनगर, एस.टी कॉलनी, टेंबवाडी, गांगोमंदिर, कांबळेगल्ली, दत्तमंदिर, शिवाजीनगर, जुना नरडवे रस्ता, विद्यानगर, नाथपैनगर, सोनगेवाडी, आचरा रोड, पटकीदेवी, बाजारपेठ, भालचंद्र नगर, स्वयंभू मंदिर, मधलीवाडी आदी आठ प्रभागात साफसफाई मोहीम राबविण्यात आली.५०० हुन अधिक विद्यार्थी या मोहीमेत सहभागी झाले होते. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानsindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे