शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

सिंधुदुर्ग : रो-रो सेवा देशपातळीवर विस्तारित करण्याच्या हालचाली कोकण रेल्वेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 10:49 IST

कोकण रेल्वेच्या  उत्पन्नात भर टाकणारी  माल वाहतुकीची रो-रो सेवा  देश पातळीवर विस्तारित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  कोकण रेल्वेच्या क्षेत्राबाहेर प्रथमच गुजरातपर्यंत ही रो- रो सेवा धावली आहे.

ठळक मुद्दे; उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नमुंबईतील पश्चिम रेल्वेच्यावतीने सुरतकल ते करंबेळी (गुजरात) अशी रो-रो सेवेची चाचणीवातावरणातील प्रदूषण रोखले जावे, इंधनाची बचत व्हावी आणि माल वाहतुकीचा प्रवास जलद आणि सुखकर

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेच्या  उत्पन्नात भर टाकणारी  माल वाहतुकीची रो-रो सेवा  देश पातळीवर विस्तारित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  कोकण रेल्वेच्या क्षेत्राबाहेर प्रथमच गुजरातपर्यंत ही रो- रो सेवा धावली आहे. मुंबईतील पश्चिम रेल्वेच्यावतीने सुरतकल ते करंबेळी (गुजरात) अशी रो-रो सेवेची चाचणी घेण्यात आली. त्यामुळे ही सेवा देश पातळीवर विस्तारित झाल्यास कोकण रेल्वेला फायदेशीर ठरणार आहे.    

वातावरणातील प्रदूषण रोखले जावे, इंधनाची बचत व्हावी आणि माल वाहतुकीचा प्रवास जलद आणि सुखकर होण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वेने सन २००१ पासून रो-रो सेवा सुरू केली आहे. यात रेल्वेच्या मालवाहतूक करणाºया वॅगनमधूनच मालवाहतूक ट्रक आणि कंटेनर्सची ने-आण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गेली अठरा वर्षे कोकण रेल्वे मार्गावरील कोलाड (रायगड) ते सुरतकल (कर्नाटक) या स्थानकांपर्यंत ही सेवा सुरू आहे. त्याचा फायदा अनेक व्यावसायिकांना होत आहे.       

कोकण रेल्वेची रो-रो सेवा इतर मार्गांवर चालविण्याबाबतची शक्यता तपासण्यासाठी पश्चिम रेल्वेच्यावतीने अलीकडेच सुरतकल ते करंबेळी (गुजरात) या दरम्यान २५ ट्रकची वाहतूक करण्यात आली. या ट्रकमध्ये प्रामुख्याने प्लास्टिक ग्रेन्युल्स, सुपारी, रोस्टेड काजू आदी सामग्रीचा समावेश होता. हे सर्व ट्रक करंबेळी येथील रेल्वेच्या ‘गुड्स’ शेडमध्ये उतरविण्यात आले.    

दरम्यान, गतवर्षी पेण ते बोईसर (वसईमार्गे) अशी रो-रो सेवेची चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर सुरतकल ते करंबेळी स्थानकापर्यंत रो-रो सेवेची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे पुढील काळात देशपातळीवर रो-रो सेवा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे.    

माल वाहतुकीची रो-रो सेवा पश्चिम रेल्वे मार्गावरदेखील सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव कोकण रेल्वेने पाठविला होता. त्यानंतर सुरतकल ते करंबेळी दरम्यान रो-रो चाचणी घेण्यात आली आहे. ही एक प्रकारे अनोखी आणि पर्यावरणपूरक सेवा आहे. भविष्यात माल वाहतूक क्षेत्रात रो-रो सेवेची प्रमुख भूमिका असणार आहे, असे रेल्वेच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे.पेण ते बोईसर रो-रो ची शक्यता!नवी मुंबई, ठाणे, घोडबंदर रोड, भिवंडी, वसई या भागांतील महामार्गावरील अवजड मालाच्या वाहतुकीमुळे सतत कोंडी होते. ही कोंडी दूर करण्यासाठी उरण येथील जेएनपीटी येथून भिवंडी, बोईसर या भागांमध्ये होणाºया मालवाहतुकीसाठी पेण ते बोईसर (वसईमार्गे) अशी रो-रो सेवा प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने गतवर्षी पेण ते बोईसर अशी रो-रो सेवेची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. त्यामुळे या सर्व मार्गांवर रो-रो सेवा कार्यान्वित झाल्यास व्यावसायिकांबरोबरच रेल्वेलाही त्याचा फायदा होणार आहे असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वेsindhudurgसिंधुदुर्ग