शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सिंधुदुर्ग : इळये पुलाला निधी मिळणार, प्रमोद जठार यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 16:19 IST

जामसंडे वळकू पाटकरवाडी-इळये वरंडवाडी पुलाला नाबार्डमधून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्य केले आहे, अशी माहिती माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली.

ठळक मुद्देइळये पुलाला निधी मिळणार, प्रमोद जठार यांची माहिती जामसंडे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा प्रश्न मिटणार

देवगड : जामसंडे वळकू पाटकरवाडी-इळये वरंडवाडी पुलाला नाबार्डमधून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्य केले आहे, अशी माहिती माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली.गेल्या अनेक वर्षांची देवगड, जामसंडे तसेच इळये पंचक्रोशीतील नागरिकांची मागणी असलेल्या जामसंडे वळकू पाटकरवाडी ते इळये वरंडवाडी या पुलाच्या जागेची जठार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता चौंडे यांच्यासमवेत पाहणी केली. यावेळी या पुलासाठी नाबार्डमधून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्य केले आहे, अशी माहिती जठार यांनी दिली.माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांनी सर्वप्रथम प्रयत्न करून या पुलासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, प्रमोद जठार यांनी पाठपुरावा केला होता. मात्र, आघाडी शासनाच्या काळात या मागणीकडे दुर्लक्ष झाले होते.हा पूल झाल्यानंतर देवगड व इळये पंचक्रोशीतील गावांमधील अंतर कमी होणार आहे. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, संदीप बांदिवडेकर आदी उपस्थित होते.भाजप सरकार असल्याने पुलाच्या मंजुरीला चालनाकेंद्रामध्ये व राज्यामध्ये भाजपाचे सरकार आल्यानंतर या पुलासाठी प्रयत्न सुरू केले, असे जठार यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील यांच्याकडे यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता.

त्याला यश आले असून बांधकाममंत्र्यांनी या पुलासाठी नाबार्डमधून साडेपाच कोटी रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे या पुलाला आता हिरवा कंदील मिळाला आहे. यासाठी भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम यांनीही वारंवार पाठपुरावा केला होता. त्यांच्याही प्रयत्नांना यश आले आहे. 

टॅग्स :Pramod Jatharप्रमोद जठारsindhudurgसिंधुदुर्गroad transportरस्ते वाहतूक