सिंधुदुर्ग : आचरा येथे ९ आॅक्टोबर रोजी इतिहास संशोधकांचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 16:56 IST2018-10-06T16:54:59+5:302018-10-06T16:56:36+5:30

मालवण तालुक्यातील संस्थानिक आचरे गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी सोबतच प्राचिनता लाभली आहे. मात्र या बाबतची माहिती नविन पीढीला नाही या दृष्टीनेच रामेश्वर वाचन मंदिर आणि धी आचरा पीपल्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार ९ आॅक्टोबर रोजी पुरातत्व शास्त्र विभाग आणि थोर इतिहास संशोधकांचे मार्गदर्शन होणार आहे.

Sindhudurg: Guided by history researchers on October 9 at Achra | सिंधुदुर्ग : आचरा येथे ९ आॅक्टोबर रोजी इतिहास संशोधकांचे मार्गदर्शन

सिंधुदुर्ग : आचरा येथे ९ आॅक्टोबर रोजी इतिहास संशोधकांचे मार्गदर्शन

ठळक मुद्देआचरा येथे ९ आॅक्टोबर रोजी इतिहास संशोधकांचे मार्गदर्शनऐतिहासीक पार्श्वभूमीचा होणार उलघडा : रामेश्वर वाचन मंदिराचा उपक्रम

सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील संस्थानिक आचरे गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी सोबतच प्राचिनता लाभली आहे. मात्र या बाबतची माहिती नविन पीढीला नाही या दृष्टीनेच रामेश्वर वाचन मंदिर आणि धी आचरा पीपल्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार ९ आॅक्टोबर रोजी पुरातत्व शास्त्र विभाग आणि थोर इतिहास संशोधकांचे मार्गदर्शन होणार आहे.

यात विनायक परब, तसेच डेक्कन महाविद्यालय पुणे चे पुरातत्व शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. अभिजित दांडेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदर कार्यक्रम वाचनालयाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आला असून अरुण पारकर आणि कपिल गुरव यांनी पुरस्कृत केला आहे.

आपण ज्या गावात राहतो त्या गावचा इतिहास त्या गावची प्राचिनता गावच्या प्रत्येक नागरिकाला ज्ञात असणे आवश्यक असते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या आचरे गावचे संदर्भ येथे घर बांधकामांवेळी उत्खननात सापडलेल्या दुर्मिळ वस्तूंवरून बुद्धकालीन संबंध असल्याचे तज्झांचे मत आहे.

काळाच्या ओघात ऐतिहासिक पार्श्वभूमी दर्शविणाऱ्या खुणा लोप पावल्या तरी इतिहास तज्ञांकडील नोंदीवरील संदर्भ जुळत असल्याचे सांगितले जाते. या दृष्टीनेच आचरा गावची प्राचिनता जाणून घेण्यासाठी रामेश्वर वाचन मंदिर आणि धी आचरा पीपल्स असोसिएशन यांच्या सहकार्याने समजून घेवूया आचरे गावचा इतिहास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन रामेश्वर वाचन मंदिर आणि शतकोत्तर रौप्यमहोत्सवी समितीतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Sindhudurg: Guided by history researchers on October 9 at Achra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.