शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

सिंधुदुर्ग : पहिल्याच पावसात लाकडी साकव गेला वाहून, पुलाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 5:09 PM

बांदा परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीपात्रावर आरोसबागवासीयांनी श्रमदानाने उभारलेला लाकडी साकव वाहून गेला. काही महिन्यांपूर्वीच याठिकाणी पुलाचे काम सुरु करण्यात आले असून यावर्षी पावसाळ्यात मात्र आरोसबागवासीयांना बांदा शहरात येण्यासाठी होडीचाच आधार घ्यावा लागणार आहे.

ठळक मुद्दे पहिल्याच पावसात लाकडी साकव गेला वाहून, पुलाचे काम सुरू  आरोसबागवासीयांना मात्र यावर्षीच्या पावसाळ्यात होडीचाच आधार

मालवण : बांदा परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीपात्रावर आरोसबागवासीयांनी श्रमदानाने उभारलेला लाकडी साकव वाहून गेला. काही महिन्यांपूर्वीच याठिकाणी पुलाचे काम सुरु करण्यात आले असून यावर्षी पावसाळ्यात मात्र आरोसबागवासीयांना बांदा शहरात येण्यासाठी होडीचाच आधार घ्यावा लागणार आहे.गेले दोन दिवस बांदा शहर व परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. नदीपात्र दुथडी भरुन वाहू लागल्याने ग्रामस्थांनी श्रमदानाने उभारलेल्या लाकडी साकवाचा नदीपात्रात टिकाव लागला नाही. परिणामी लाकडी साकव पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.सोमवार हा बांद्याचा आठवडा बाजाराचा दिवस असल्याने या साकवावरुन आरोसबागवासीयांनी पहाटेच्या सुमारास प्रवास देखील केला. मात्र त्यानंतर पाण्याचा प्रवाह वाढल्याने साकव वाहून गेला. नदीचा वेगवान प्रवाह साकवावरुन वाहू लागल्याने आरोसबाग ग्रामस्थांनी तातडीने याठिकाणी गर्दी करत साकवावरुन प्रवास करण्यास मज्जाव केला. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.आरोसबाग ग्रामस्थ दरवर्षी जानेवारी महिन्यात तेरेखोल नदीपात्रावर श्रमदानाने लाकडी साकवाची उभारणी करतात. पावसाळयात मात्र आरोसबागवासीयांना बांदा शहरात येण्यासाठी होडीचा आधार घ्यावा लागतो.येथील ग्रामस्थांची गेली कित्येक वर्षे नदीपात्रावर पुलाची मागणी आहे. यावर्षी मात्र आरोसबागवासीयांच्या पुलाच्या मागणीला मूर्त स्वरुप मिळाले. काही महिन्यांपूर्वीच या नदीपात्रावर पुलाच्या उभारणीच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.लाकडी साकव वाहून गेल्याने ग्रामस्थांनी तातडीने श्रमदानाने नदीपात्रात होडीसेवा सुरु केली आहे. येत्या दोन दिवसांत शाळा सुरु होणार असल्याने या नदीपात्रातील रहदारी वाढणार आहे. त्यामुळे नदीपात्रात आरोसबाग ग्रामस्थ श्रमदानाने होडीसेवा देणार आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गriverनदीmonsoon 2018मान्सून 2018