शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सिंधुदुर्ग : शिवस्मारकाच्या मुद्यावरून राज्यकर्त्यांकडून जनतेच्या डोळ्यात फक्त धूळफेकच  : उपरकर यांची टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 16:28 IST

कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडीच्या शासनाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अजुन काही उभरता आलेला नाही. फक्त या शिवस्मारकाच्या मुद्यावरून मागील २० वर्षे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणे सुरू आहे. अशी टिका मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी येथे केली.

ठळक मुद्देशिवस्मारकाच्या मुद्यावरून राज्यकर्त्यांकडून जनतेच्या डोळ्यात फक्त धूळफेकच सत्ताधारी पुतळा उभारण्यात अपयशी : उपरकर यांची टिका

कणकवली :पोलाद पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राज्याची अस्मिता जोपासली आहे. तसेच जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. मात्र, महाराष्ट्रात सत्तेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्या शिवसेना - भाजप युतीच्या शासनाला तसेच त्यापूर्वी सत्तेत असलेल्या कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडीच्या शासनाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अजुन काही उभरता आलेला नाही. फक्त या शिवस्मारकाच्या मुद्यावरून मागील २० वर्षे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणे सुरू आहे. अशी टिका मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी येथे केली.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनविसे उपजिल्हाध्यक्ष अनिल राणे, शहराध्यक्ष शैलेंद्र नेरकर , संतोष कुडाळकर आदी उपस्थित होते. परशुराम उपरकर म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यु ऑफ युनिटी'च्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी सर्व देशाला गुजरातची अस्मिता दाखवून दिली आहे.महाराष्ट्रात मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल चालढकलपणा होत आहे. राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर केवळ निवडणुकीसाठी करीत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपतींचे स्मारक अरबी समुद्रात होणे शक्य नसल्याचे याआधीच जाहीर केले होते. 'एल अँड टी' ने केलेल्या चाचणीत स्मारकासाठी आवश्यक खडकच या समुद्रात नसल्याचे समोर आले आहे.महाराष्ट्रातील गडकिल्ले हेच खरे शिवाजी महाराजांचे स्मारक आहेत. त्यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. मात्र, त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्याची शिवकालीन प्रतिकृती निर्माण करणे आवश्यक आहे. ज्यामुळे सध्याच्या पिढीला शिवकालिन बाजारपेठ तसेच इतिहासाची माहिती मिळेल.शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे या प्रतिकृतीची माहिती तयार आहे. त्याचा उपयोग करता येईल. मात्र, याबाबत कोणीही विचार करीत नाही. मुंबई येथील अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा खर्च काँग्रेस राजवटीत ४०० कोटींचा होता . आता तो शिवसेना -भाजप राजवटित १६ हजार कोटींवर पोचला आहे.सरदार वल्लभभाई पटेल यांचा २३०० कोटींचा पुतळा ४ वर्षात होतो, तर शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न २० वर्षे होऊनही अजूनही रेंगाळत पडला आहे. सत्ताधाऱ्यांकडून फक्त वांझोट्या गप्पा मारल्या जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा तसेच इतर भागातील गडकिल्ल्यांचे संवर्धन केल्यास जनतेच्या मनातील छत्रपतींची अस्मिता जपली जाईल. तेच खरे छत्रपतींचे स्मारक असेल. शासनाच्या नाकर्तेंपणामुळे मराठी पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमासह सीबीएसई अभ्यासक्रमातून शिवाजी महाराजांचा धडा गायब झाला आहे. ही शोकांतिका आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातला विकसित केले. आरबीआयसह सर्व शासकीय मुख्य कार्यालये गुजरातला नेऊन गुजरातची अस्मिता जपण्याचे काम ते करीत आहेत. मात्र यातुन देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे महत्व कमी होत आहे. याबाबत सर्वच राज्यकर्ते मूग गिळून गप्प बसले आहेत. असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.शिवप्रेमिनी त्याना धडा शिकवावा !राज्यातील गडकिल्ले शाबूत ठेवून त्यांचे संवर्धन करून त्यातून पर्यटन वाढविणे सहज शक्य आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे येत्या काळात फक्त आश्वासने देऊन फसविणाऱ्या राज्यकर्त्यांना शिवप्रेमिनी आता मतदानातून धडा शिकवावा.असे आवाहनही परशुराम उपरकर यांनी यावेळी केले.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर MNSमनसेsindhudurgसिंधुदुर्ग