सिंधुदुर्ग : राज्यातील जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) निधी वितरणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने गगनभरारी घेतली आहे. २७ मार्च २०२६ पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, १०० टक्के निधी वितरीत करून सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. कोकणातील या जिल्ह्याने विकासाच्या कामात तत्परता दाखवत राज्यासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला हाताशी धरून केलेल्या काटेकोर नियोजनामुळे हे यश मिळविणे शक्य झाले आहे.अशी आहे आकडेवारीशासनाकडून जिल्ह्याला एकूण २,८२०,००० रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. विशेष म्हणजे, मिळालेला हा संपूर्ण २,८२०,००० रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पूर्णपणे वितरीत करण्यात आला आहे. वितरणाची ही टक्केवारी अचूक १०० टक्के भरत असून, असा टप्पा गाठणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील एकमेव जिल्हा ठरला आहे.
इतर जिल्ह्यांची स्थिती:सिंधुदुर्गनंतर अमरावती (९९.९९%) दुसऱ्या, तर परभणी (९९.९९%) तिसऱ्या स्थानावर आहे. पुणे आणि मुंबई उपनगर यांसारख्या मोठ्या जिल्ह्यांनाही मागे टाकत सिंधुदुर्गने अव्वल स्थान पटकावले आहे. जिल्ह्याच्या या यशामुळे विकासकामांना मोठी गती मिळणार असून, प्रशासकीय नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Web Summary : Sindhudurg leads Maharashtra in DPC fund allocation with 100% distribution. Thanks to meticulous planning under Guardian Minister Nitesh Rane, the district has become a model for development, surpassing even larger districts like Pune.
Web Summary : सिंधुदुर्ग 100% वितरण के साथ डीपीएसी निधि आवंटन में महाराष्ट्र में सबसे ऊपर है। संरक्षक मंत्री नितेश राणे के तहत सावधानीपूर्वक योजना के लिए धन्यवाद, जिला विकास के लिए एक मॉडल बन गया है, यहां तक कि पुणे जैसे बड़े जिलों को भी पीछे छोड़ दिया।