सिंधुदुर्ग : दोडामार्ग येथे कारमधील डिजिटल स्क्रीन, स्टिरिओ लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:55 PM2018-12-31T12:55:43+5:302018-12-31T12:56:42+5:30

दोडामार्ग येथील हडीकर प्लाझाच्या आवारात फोंडू हडीकर यांनी उभी करून ठेवलेल्या कारची काच अज्ञात चोरट्याने फोडून आतील डिजिटल स्क्रीन व स्टिरिओ लंपास केला. यात हडीकर यांचे सुमारे ८५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.

Sindhudurg: Digital screen in the car at Dodamarg, Stereo Lampas | सिंधुदुर्ग : दोडामार्ग येथे कारमधील डिजिटल स्क्रीन, स्टिरिओ लंपास

फोंडूू हडीकर यांच्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने आतील चिप लंपास केली. (वैभव साळकर)

Next
ठळक मुद्देदोडामार्ग येथे कारमधील डिजिटल स्क्रीनस्टिरिओ लंपास, ८५ हजार रूपयांचे नुकसान

दोडामार्ग : येथील हडीकर प्लाझाच्या आवारात फोंडू हडीकर यांनी उभी करून ठेवलेल्या कारची काच अज्ञात चोरट्याने फोडून आतील डिजिटल स्क्रीन व स्टिरिओ लंपास केला. यात हडीकर यांचे सुमारे ८५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.

भर बाजारपेठेतील हमरस्त्यावर हा प्रकार घडल्यामुळे शहरातील कारचालकात खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजता घडली.

फोंडू हडीकर यांनी आपल्या मालकीची मारूती स्वीफ्ट कार हडीक प्लाझाच्या समोर उभी करून ठेवली होती. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दगडाच्या साहय्याने चालकाच्या बाजूकडील काच फोडून आतील डिजिटल स्क्रीन व स्टिरिओ फोडला व आतील किंमती चिप चोरून नेली. गाडीला सेंटर लॉक असल्याने आवाज येऊ लागला. त्यामुळे हा प्रकार लक्षात आला.

हडीकर यांनी याबाबत दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भरबाजारपेठेत घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
 

Web Title: Sindhudurg: Digital screen in the car at Dodamarg, Stereo Lampas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.