सिंधुदुर्ग : पुणे येथील अपघातात वेंगुर्लेतील एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 15:55 IST2018-05-16T15:55:12+5:302018-05-16T15:55:12+5:30

मूळचे वेंगुर्ले तालुक्यातील परबवाडा-पवारवाडी येथील व सध्या पुणेस्थित सचिन गणेश पवार (४६) यांचा सोमवारी पुणे येथे झालेल्या दुचाकी अपघातात मृत्यू झाला.

Sindhudurg: Death of one in Vengurla in an accident in Pune | सिंधुदुर्ग : पुणे येथील अपघातात वेंगुर्लेतील एकाचा मृत्यू

सिंधुदुर्ग : पुणे येथील अपघातात वेंगुर्लेतील एकाचा मृत्यू

ठळक मुद्देकामावर जात असताना दुचाकीला अपघात डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू

सिंधुदुर्ग : मूळचे वेंगुर्ले तालुक्यातील परबवाडा-पवारवाडी येथील व सध्या पुणेस्थित सचिन गणेश पवार (४६) यांचा सोमवारी पुणे येथे झालेल्या दुचाकी अपघातात मृत्यू झाला.

नोकरीनिमित्त पुणे येथे वास्तव्यास असलेले सचिन पवार हे सुटी असल्याने वेंगुर्लेत आले होते. रविवारी रात्रीच्या गाडीने ते पुण्यात परतले होते. सोमवारी सकाळी कामावर जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला.

यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी मृतदेह वेंगुर्ले-परबवाडा येथील निवासस्थानी आणून दाडाचे टेंब येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, तीन भाऊ, भावजया, पुतणे-पुतण्या असा परिवार आहे. वेंगुर्ले-गाडीअड्डा तिठा येथील सलून व्यावसायिक गणेश पवार यांचे ते पुत्र, माजी उपसरपंच विश्वास पवार, निकेश पवार व कुडाळ न्यायालयातील विजय पवार यांचे बंधू तसेच वेंगुर्ले दूरसंचारच्या कर्मचारी वर्षा पवार यांचे ते दीर होत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Web Title: Sindhudurg: Death of one in Vengurla in an accident in Pune