सैनिकाचा दुचाकी अपघातात मृत्यू

By Admin | Published: June 1, 2014 12:13 AM2014-06-01T00:13:07+5:302014-06-01T00:25:44+5:30

गंगाखेड : तालुक्यातील उंडेगाव येथील एका सैनिकाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना ३१ मे रोजी घडली.

A soldier dies in a motorcycle accident | सैनिकाचा दुचाकी अपघातात मृत्यू

सैनिकाचा दुचाकी अपघातात मृत्यू

googlenewsNext

गंगाखेड : तालुक्यातील उंडेगाव येथील एका सैनिकाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना ३१ मे रोजी घडली. उंडेगाव येथील सूर्यकांत गोपीनाथ सावंत हे मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे भारतीय स्थलसेनेमध्ये शिपाई या पदावर कार्यरत होते. सावंत हे ३० मे रोजी दुचाकी क्रमांक एम.एच.२२- व्ही.८५५७ गंगाखेडहून गावाकडे जात होते. कोद्री रोडवरील १३२ केव्हीजवळ समोरुन येणारी दुचाकी क्रमांक (एम.एच.२२ -एई९४९२) या गाडीचा समोरासमोर अपघात झाला. यामध्ये सूर्यकांत तुळशीराम जाधव, संतोष रमेश कुसळे, सैनिक सूर्यकांत सावंत हे तिघेही गंभीर जखमी झाले. या जखमींना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ३१ मे रोजी सकाळी १० वाजता सैनिक सूर्यकांत सावंत याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सैनिक सूर्यकांत जाधव हे २०१० मध्ये आर्मीमध्ये शिपाई म्हणून भरती झाले होते. चार वर्षांच्या सेवेनंतर सुषमा भालेराव यांच्याशी पाच दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. विवाहानंतर नियतीने घाला घातला. सूर्यकांत सावंत यांच्या पश्चात आई, वडील, तीन भाऊ, पत्नी असा मोठा परिवार आहे. सूर्यकांत सावंत यांच्यावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: A soldier dies in a motorcycle accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.