शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

सिंधुदुर्ग : चवीने खाणार त्याला संज्याभाय देणार, गरम भजी, वडापाव मिळण्याचे ठिकाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 2:22 PM

महिलांच्या हातची चवही ज्याच्या हातातील जादूमय चवीपुढे लोक विसरून जात आणि मस्त गरमागरम कांदा भजीवर असंख्य खवय्ये ताव मारीत असल्याचे चित्र गेली अनेक वर्षे मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव तिठ्यावरील कोळंबा वडापाव सेंटरमध्ये दिसून येत होते.

ठळक मुद्देचवीने खाणार त्याला संज्याभाय देणारगरमागरम भजी, वडापाव मिळण्याचे ठिकाण

निकेत पावसकर 

सिंधुदुर्ग : महिलांच्या हातची चवही ज्याच्या हातातील जादूमय चवीपुढे लोक विसरून जात आणि मस्त गरमागरम कांदा भजीवर असंख्य खवय्ये ताव मारीत असल्याचे चित्र गेली अनेक वर्षे मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव तिठ्यावरील कोळंबा वडापाव सेंटरमध्ये दिसून येत होते.

वेगळ्याच शैलीने आणि अस्सल कोकणी पद्धतीने बनविलेली कांदा भजी खाण्यासाठी नांदगावच्या चोहोबाजूंनी गर्दी व्हायची. प्रत्येक खवय्याला तेवढ्याच मनापासून कोळंबा वडापाव सेंटरचे मालक संजय मोर्ये भजी द्यायचे. परंतु, महामार्गाच्या चौपदरीकरणात आता ही जागा ते बदलणार आहेत. यामुळे सायंकाळी या टपरीवर अनेकांच्या रंगणाऱ्या गप्पांचे ठिकाण बदलणार आहे.गेली कित्येक वर्षे मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली ते खारेपाटण आणि फोंडा ते देवगड भागातील अनेकांचे विसाव्याचे ठिकाण असलेल्या कोळंबा वडापाव सेंटरची जागा आता चौपदरीकरणामुळे बदलणार आहे. मात्र, काही झालेतरी कांदाभजी चवीने खाणार त्याला संज्याभाय देणार याच्याशी ते ठाम आहेत. अनेकांचे संध्याकाळी भेटण्याचे हे ठिकाण होते.

या भागातील समस्त भजी, वडा खवय्यांच्या मनात संज्या हे नाव कोरले गेलेले आहे. भजी, वडापाव खाता खाता वरून चहाचा घोट घेत हास्यविनोद, गप्पागोष्टी, एकमेकांशी चर्चा, मिस्कीलपणे सुरू असलेली चेष्टामस्करी करतानाच अनेक राजकीय चर्चाही येथे रंगायच्या.कोळंबा वडापाव सेंटर नाव असलेली संजय मोरये यांची गाडी तिठ्यावर चार वाजल्यानंतर सुरू व्हायची. रात्री साडेनऊपर्यंत या टपरीवर अनेक ठिकाणच्या खवय्यांची लगबग सुरू असायची. जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण ते कणकवलीपर्यंत महामार्गावर कांदाभजी खायची म्हटली की अनेकांच्या तोंडातून आपोआप नाव येते ते म्हणजे नांदगाव येथील संजय मोरये यांचेच.या भागातील मुंबईकर चाकरमानी गावी आल्यावर एकदातरी येऊन संजयकडील भजी, वडा खाल्ल्याशिवाय जात नाहीत आणि कांदाभजीची चव अनेक महिने जिभेवर रेंगाळत राहते. कारण संजयनेही काही पथ्य पाळली आहेत.

कितीही गर्दी झाली तरीदेखील गिºहाईक निघून जाईल म्हणून अर्धवट भाजलेली कच्ची भजी किंवा वडे कधीच कुणाला दिले नाहीत. तर भजी प्लेट चहाची ग्लास नेहमी संजयकडे स्वच्छ आणि चकाचक पहायला मिळतात.मात्र, आता चौपदरीकरण कामामुळे ही जागा बदलेल आणि अनेकवर्षे ज्या मित्रांनी व इतरांनी आपला वेळ मजेत घालवला ते ठिकाण बदलेल. संजयच्या महामार्गालगतच नवीन जागेत पुन्हा एकदा मित्रांच्या खवय्यांच्या गप्पा गोष्टी रंगतील. मात्र जुन्या जागेची आठवण विसरणे शक्य नसेल.नियम म्हणजे नियमकाहीवेळा तासन्तास थांबावे लागले तरी चालेल. मात्र, अनेकजण आपल्या जिभेचे चोचले येथेच पुरे करतात. कांदाभजी ही संजयची खासियत असल्याने अनेकदा तिथे खूप वेळ उभे रहावे लागते. अशावेळी आपल्या ओळखीचा किंवा अगदी जवळचा मित्र जरी आला तरीदेखील जो पहिला त्याला प्रथम याप्रमाणे तिथे भजी अथवा वडापाव मिळतो. त्यांच्याकडे नियम म्हणजे नियम हे सूत्र पाळले जाते.संजय मोरये आपल्या भजी, वडापाव गाडीवर काम करताना दिसत आहेत.

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग