शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

सिंधुदुर्ग : मारहाण प्रकरणातील आरोपींना अटक करा..सार्वजनिक बांधकाम विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:21 PM

खारेपाटण येथे कार्यकारी अभियंता प्रदीप सदाशिव व्हटकर यांना तेथील काही स्थानिक लोकप्रतिनीधी व जमावाने केलेल्या मारहाणीचा सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचारी संघटनेने जाहीर निषेध करत दिवसभर काळ्याफिती लावून काम केले.

ठळक मुद्देमारहाण प्रकरणातील आरोपींना अटक करा..सार्वजनिक बांधकाम विभागजिल्हाधिकारी व अपर पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर

सिंधुदुर्ग : खारेपाटण येथे कार्यकारी अभियंता प्रदीप सदाशिव व्हटकर यांना तेथील काही स्थानिक लोकप्रतिनीधी व जमावाने केलेल्या मारहाणीचा सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचारी संघटनेने जाहीर निषेध करत दिवसभर काळ्याफिती लावून काम केले.

व्हटकर यांना मारहाण करणारे संशयित हे राजकीय पक्षांशी निगडीत कार्यकर्ते आहेत. त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता सर्व संशयित आरोपींना तत्काळ अटक करा अशी मागणी संघटनेने जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक निमीत गोयल यांच्याकडे भेट घेऊन केली.कणकवली विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर व चालक यांना ११ डिसेंबर रोजी खारेपाटण येथे काही जणांनी मारहाण केली होती. या मारहाणीचा पहिल्यांदा चालक संघटनेच्यावतीने तदनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी जाहीर निषेध करून अटकेच्या कारवाईची मागणी केली आहे.

यावेळी कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर, युवराज देसाई, किसन घाडगे, ए.के.निकम, ए.डी.आवटी, पी. जी. तावडे, एस. पी. हिवाळे, के. के. प्रभू, अनामिका जाधव,अशोक दांडगे, गौरव ढेवले, विलास परब, सुभाष गोंधळी, एस. एन.बागवे यांच्यासह संघटनेच्या ५० जणांनी बुधवारी जिल्हाधिकारी व अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी व कर्मचारी संघटनेने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खारेपाटण येथे एका रस्त्यावर कोसळले झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी गेलेल्या कार्यकारी अभियंता व्हटकर यांना तेथील स्थानिक लोकप्रतिनीधी व जमावाने मारहाण केली. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर क्षेत्रिय अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मालवणमध्ये शाखा अभियंता यांनाही काही महिन्यांपूर्वी मारहाण झाली होती. यामुळे जिल्ह्यातील अधिकारी कर्मचा-यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.व्हटकर यांना मारहाण करणा-या सर्व संशयितांना तत्काळ अटक करून अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे व अपर पोलीस अधीक्षक निमीत गोयल यांच्याकडे भेट घेऊन केली आहे. दरम्यान बुधवार दिवसभर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी काळ्याफिती लावून काम करत निषेध नोंदविला.उर्वरित संशयितांना लवकरच अटक करू - गोयलअभियंता व्हटकर यांना मारहाण करणाऱ्या संशयितांना अटक करा अशी मागणी संघटने केली असता, अपर पोलीस अधीक्षक निमीत गोयल यांनी आपण उर्वरित संशयितांना लवकरच अटक करू असे आश्वासन दिल्याचे संघटनेच्या अधिकारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्ग