सिंधुदुर्ग : तीन राज्यातील विजयानंतर जल्लोष, काँग्रेसमध्ये उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 18:15 IST2018-12-11T18:13:15+5:302018-12-11T18:15:12+5:30
राजस्थान, छत्तीसगड तसेच मध्यप्रदेशमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य पसरले असून, सावंतवाडीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला. तर सावंतवाडीप्रमाणे कणकवली शहरातही कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला.

तीन राज्यातील विजयानंतर सावंतवाडीत काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला.
सिंधुदुर्ग : राजस्थान, छत्तीसगड तसेच मध्यप्रदेशमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य पसरले असून, सावंतवाडीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला. तर सावंतवाडीप्रमाणे कणकवली शहरातही कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला.
सावंतवाडी शहरातील गांधी चौक तसेच शिवरामराजेंच्या पुतळ््यासमोर उत्साहात घोषणा तसेच आतषबाजीही केली. यावेळी महिला प्रदेश प्रतिनिधी विभावरी सुकी, तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर, काशिनाथ दुभाषी आदी उपस्थित होते.
राजस्थान तसेच छत्तीसगड व मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसने चांगले यश मिळवले आहे. राजस्थान व छत्तीसगडमध्ये एक हाती सत्ता काँग्रेसने आणली आहे. तर मध्यप्रदेशमध्ये सत्तेच्या जवळ काँग्रेस जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे राज्यातच नव्हे, तर देशात काँग्रेसमध्ये नवचैतन्य पसरले आहे. सावंतवाडीत काँग्रेसने जल्लोष केला.
ठिकठिकाणी काँग्रेसच्यावतीने जोरदार आतषबाजी करण्यात आली आहे. गांधी चौक तसेच शिवरामराजेंच्या पुतळ््यासमोर काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या.
यावेळी प्रदेश प्रतिनिधी विभावरी सुकी, तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर, राघवेंद्र नार्वेकर, महेंद्र सांगेलकर, संदीप सुकी, साक्षी वंजारी, माया चिटणीस, प्रेमानंद देसाई, समीर वंजारी आदी सहभागी झाले होते.