Sindhudurg ZP Election Results 2026: माडखोलमध्ये अपक्षांचा डंका; भाजप बंडखोरांनी मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 11:12 IST2026-02-09T11:11:32+5:302026-02-09T11:12:24+5:30
बंडखोरीचा फटका

Sindhudurg ZP Election Results 2026: माडखोलमध्ये अपक्षांचा डंका; भाजप बंडखोरांनी मारली बाजी
सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील माडखोल जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात अपक्ष उमेदवारांनी ऐतिहासिक विजय मिळवत आपले खाते उघडले आहे. विशेष म्हणजे विजयी झालेले तिन्ही उमेदवार हे भाजपचे बंडखोर असून त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना पराभवाचा धक्का दिला आहे.
विजयी उमेदवारांची यादी
जिल्हा परिषद मतदारसंघ: शिवानी संजय नाईक (विजयी)
पंचायत समिती मतदारसंघ: अवनी राऊळ (विजयी)
पंचायत समिती मतदारसंघ: प्रथमेश सावंत (विजयी)
वाचा: सिंधुदुर्गात महायुतीचे वर्चस्व; ७ पैकी ७ जागांवर भाजप आणि शिंदेसेना आघाडीवर
बंडखोरीचा फटका
भाजपमधील अंतर्गत नाराजीचा थेट फायदा या अपक्ष उमेदवारांना झाला आहे. कार्यकर्त्यांची ताकद आणि वैयक्तिक जनसंपर्क अधिकृत चिन्हापेक्षा भारी पडल्याचे येथे दिसते. माडखोलमध्ये पक्षनिष्ठेपेक्षा स्थानिक उमेदवारांच्या कामावर मतदारांनी विश्वास दाखवल्याचे चित्र आहे.
Maharashtra ZP Election Result 2026 Live: जिल्हा परिषद निकाल: सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा आणि महायुतीला आघाडी
सत्तेची समीकरणे बदलणार?
या विजयामुळे आता हे अपक्ष उमेदवार कोणाला पाठिंबा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे स्थानिक सत्तेची समीकरणे बदलू शकतात.