भरधाव डंपरच्या धडकेत श्रावण सरपंच गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 12:36 IST2020-12-10T12:35:04+5:302020-12-10T12:36:39+5:30

Malvan, Accident, sarpanch, hospital, sindhudurg मालवण तालुक्यातील शिरवंडे मार्गावर सोमवारी सायंकाळी भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत श्रावणचे सरपंच प्रशांत परब गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर पडवे येथील लाईफटाईम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुचाकीवरून प्रवास करताना हा अपघात झाला.

Shravan Sarpanch seriously injured in Bhardhaw dumper collision | भरधाव डंपरच्या धडकेत श्रावण सरपंच गंभीर जखमी

पडवे येथील रुग्णालयात जखमी श्रावण सरपंच प्रशांत परब उपचार घेत आहेत. .

ठळक मुद्देभरधाव डंपरच्या धडकेत श्रावण सरपंच गंभीर जखमी मालवण तालुक्यातील शिरवंडे येथील घटना

मालवण: तालुक्यातील शिरवंडे मार्गावर सोमवारी सायंकाळी भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत श्रावणचे सरपंच प्रशांत परब गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर पडवे येथील लाईफटाईम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुचाकीवरून प्रवास करताना हा अपघात झाला.

दरम्यान, अपघातास १५ तास उलटूनही अद्याप डंपर चालकावर गुन्हा दाखल न झाल्याने पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगावकर यांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भरधाव वेगात जाणारा डंपर हा वाळू भरण्यास जात होता. डंपर चालकाकडे इन्शुरन्स व अन्य कागदपत्रेही नव्हती.
तरी गंभीर अपघातास कारणीभूत ठरलेल्या डंपर चालकावर गुन्हा दाखल न झाल्यास आपल्याला लोकशाही मार्गाने आंदोलनाची भूमिकाही घ्यावी लागेल. आमच्यासाठी आमच्या माणसांचे जीव महत्त्वाच आहेत, असेही घाडीगावकर यांनी सांगितले

 

Web Title: Shravan Sarpanch seriously injured in Bhardhaw dumper collision