शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांकडून अधिकारी धारेवर

By admin | Updated: July 19, 2015 00:31 IST

अनुपस्थितीबाबत नाराजी : चौके येथे सिंधु समाधान कार्यक्रम

चौके : येथील सिंधु समाधान कार्यक्रमात विविध प्रश्नांचा भडीमार करत उपस्थित अधिकाऱ्यांना मालवण तालुक्यातील सरपंचांनी धारेवर धरले. या सिंधु समाधान कार्यक्रमाला गटविकास अधिकारी, इतर अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. याबाबतही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. सिंधु समाधान कार्यक्रम शुक्रवारी चौके येथील भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय सभागृहात मालवणचे नायब तहसीलदार एस.पी. खडपकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ, गटशिक्षणाधिकारी वसंत महाले, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता आर.जे. कोकाटे, पंचायत समिती सदस्या श्रद्धा केळूसकर, पशुधन विकास अधिकारी डी. व्ही. माईणकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मालवणचे आर. व्ही. फोेंडेकर, पंचायत समिती कृषी विभागाचे के.टी. पाताडे, व्ही. के. जाधव, लघु पाटबंधारे विभाग मालवणचे शाखा अभियंता अमित भोसले, मंडळ अधिकारी नामदेव जाधव, चौके हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. डी. सावंत, गोळवण सरपंच सुभाष लाड, साळेल सरपंच साबाजी गावडे, काळसे सरपंच चंद्रकांत दळवी, कुणकवळे सरपंच प्रकाश पोळ, आंबडोस सरपंच विष्णू परब, धामापूर सरपंच विजयकुमार धामापूरकर, आंबेरी सरपंच साक्षी कांबळी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे राम धनावडे, साळेलचे माजी सरपंच कमलाकर गावडे आदी मान्यवर आणि पंचक्रोशीतील ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेवक, सेविका, मुख्याध्यापक, पोलीस पाटील आणि विविध खात्यांचे कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र चौकेच्यावतीने स्टॉल लावून आरोग्य तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी, नेत्र तपासणी, रक्तगट तपासणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली. याचा परिसरातील उपस्थित ग्रामस्थांनी लाभ उठवला. त्याचप्रमाणे यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी १०८ रुग्णवाहिकेच्या सेवेचे तोंडभरुन कौतुक केले. (वार्ताहर)