मालवणमध्ये गतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार; संशयिताला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 12:53 IST2021-12-20T12:52:28+5:302021-12-20T12:53:33+5:30
मालवण शहरानजीक एका गावातील गतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

मालवणमध्ये गतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार; संशयिताला अटक
मालवण : मालवण शहरानजीक एका गावातील गतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या तक्रारीनुसार सच्चिदानंद उर्फ भाई श्रीकृष्ण केळुसकर (वय-३५) या तरुणा विरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सच्चिदानंद उर्फ भाई यास ताब्यात घेत रविवारी रात्री उशिरा अटक केल्याची माहिती मालवण पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांनी सोमवारी सकाळी दिली. या प्रकरणी नियंत्रण कक्ष ओरोसच्या पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे अधिक तपास करत आहेत.