शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित कामांचा निपटारा करा

By admin | Updated: August 12, 2015 23:20 IST

स्नेहलता चोरगे : वैभववाडी तालुका विकास समिती सभा

वैभववाडी : विकास कामांना गती देण्यासाठी आढावा सभा घेतल्या जातात. मात्र, प्रत्येक वेळी तीच ती कामे प्रलंबित दिसत आहेत. हे योग्य नसून अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवून पुढील विकास समितीच्या सभेपूर्वी प्रलंबित कामांचा निपटारा करावा, असे आवाहन महिला व बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे यांनी तालुका विकास समितीच्या सभेत केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर चोरगे व गटविकास अधिकारी सदानंद पाटील यांनी आसूड ओढले.तालुका विकास समितीची सभा स्नेहलता चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात झाली. सभेला सभापती वैशाली रावराणे, गटविकास अधिकारी सदानंद पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी मिलिंद जाधव व खातेप्रमुख उपस्थित होते.चोरगे पुढे म्हणाल्या की, ग्रामपंचायत हे शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोचवण्याचे प्रमुख माध्यम आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीना विश्वासात घेऊन विकासाचा समतोल साधणे आवश्यक आहे. विकास प्रक्रियेत अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे योगदान सारखेच असते. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन ग्रामपंचायतींनी विकास कामांची भूमिपुजने व उद्घाटने करावीत. तसेच कामे मुदतीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.विकास कामांचा आढावा घेताना गटविकास अधिकारी पाटील यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या उद्दिष्टपूर्तीत वैभववाडी तालुका गेली ३ वर्षे ५0 टक्क्यांच्या खाली राहिला आहे. त्याला सर्व विभागांच्या यंत्रणा जबाबदार असल्याचे स्पष्ट करीत प्रत्येक विभागाने दर आठवड्याच्या गुरुवारी आपल्याला अहवाल द्यावा. ज्यांचा अहवाल प्रत्येक गुरुवारी मिळणार नाही त्यांचा गोपनीय अहवाल आपण मुख्यकार्यकारी अधिकारी यांना पाठविणार असल्याचे गटविकास अधिकारी पाटील यांनी सांगितले.बाजारपेठेतील जिल्हा परिषद विश्रामगृहाच्या आवारात अतिक्रमण सुरु झाले आहे. ते वेळीच थांबवा. कारण अतिक्रमण वाढले तर ते नंतर हटविणे अवघड होईल. त्यामुळे विश्रामगृहाच्या दुरुस्तीसाठी मंजूर निधीचा विनियोग करुन विश्रामगृहासह परिसर सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना गटविकास अधिकारी पाटील यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिल्या.तालुक्यातील २३ शाळांमध्ये गेल्यावर्षी सेमी इंग्रजी सुरु झाली. मात्र त्यातील १0 शाळांमध्येच यावर्षी सेमी इंग्रजी सुरु आहे. सेमी इंग्रजीसाठी तज्ज्ञ शिक्षक उपलब्ध नव्हते तर ते सुरू करण्याची घाई का केली. ज्या शाळांनी सेमी इंग्रजी यावर्षी बंद केले तेथील विद्यार्थ्यांची अवस्था काय? असा प्रश्न कुर्ली सरपंच सूर्यकांत पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर प्रभारी गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे यांनी तालुक्यात सेमी इंग्रजी शिकवू शकणारे केवळ दोनच शिक्षक आहेत. त्याचप्रमाणे सेमी सुरु ठेवायचे की नाही याचे सर्वाधिकार व्यवस्थापन समितीचे आहेत. (प्रतिनिधी)चौकशी लावू का : स्नेहलता चोरगेसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार लोकप्रतिनिधींच्या सुचनांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. असे सुनावत कार्यकारी अभियंता छाया नाईक यांना एकदा तालुक्यातील रस्त्यांवरुन सैर घडवा. म्हणजे रस्त्यांच्या स्थितीकडे त्यांचे लक्ष जाईल, असे स्नेहलता चोरगे यांनी बांधकामच्या अधिकाऱ्यांना फटकारले. तोच संदर्भ पकडून वर्षभरात रस्ते खराब होतातच कसे ? असा सवाल करीत मी माझ्या अधिकारात सर्व रस्त्यांच्या कामांची ‘क्वॉलिटी कंट्रोल’मार्फत चौकशी लावू का? असे गटविकास अधिकारी पाटील यांनी विचारणा केल्यावर सार्वजनिक बांधकामचे अधिकारी निरुत्तर झाले.सभेकडे लोकप्रतिनिधींची पाठमहिला व बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या तालुका विकास समितीच्या सभेला सभापती वैशाली रावराणे व ३५ पैकी चार गावचे सरपंच उपस्थित होते. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व सदस्य काँग्रेसचे असूनही उर्वरित ७ जणांनी सभेकडे पाठ फिरवली. त्यावरुन काँग्रेसचाच चोरगेंना विरोध आहे की काय ? अशी चर्चा सुरू होती. त्याबाबत चोरगे यांना विचारले असता, लोकप्रतिनिधींचे काहीतरी महत्वाचे काम असेल असे सूचित करून अधिक भाष्य टाळले.