Sindhudurg-Sawantwadi Nagar Parishad Election Result 2025: सावंतवाडीत उध्दवसेना, काँग्रेसने खाते उघडले; भाजप चार जागांवर आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 10:55 IST2025-12-21T10:53:42+5:302025-12-21T10:55:38+5:30
Sindhudurg-Sawantwadi Local Body Election Result 2025: भाजपाने या निवडणुकीत जोरदार मोर्चेबांधणी केली होती

Sindhudurg-Sawantwadi Nagar Parishad Election Result 2025: सावंतवाडीत उध्दवसेना, काँग्रेसने खाते उघडले; भाजप चार जागांवर आघाडीवर
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक निकालाच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या मतमोजणीत भाजपने चार जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस व उद्धवसेना यांचे उमेदवार प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत. भाजपचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक सुधीर आडवडेकर, दुलारी लागणेकर मोहिनी मडगावकर यांचा विजयी आघाडी घेतली आहे.
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा सावंत भोसले या सहाशे मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे नगरसेवक पदाचे दिपाली भालेकर, आनंद नेवगी, सुनिता पेडणेकर, सुधीर आडिवरेकर, दुलारी रांगणेकर, मोहिनी मडगावकर यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. तर काँग्रेसच्या तैकिर शेख, तसेच शिंदे सेनेच्या सायली दुभाषी, बाबू कुडतरकर तर उध्दव सेनेचे देवेंद्र टेमकर हे विजयी झाले आहेत.
राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने या निवडणुकीत जोरदार मोर्चेबांधणी केली होती. अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. दरम्यान, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोसले यांच्या तोडक्यामोडक्या मराठीमुळे त्या मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाल्या होत्या. काही तासातच निकालाचे चित्र स्पष्ट होणार असून सावंतवाडीत कोण बाजी मारणार हे स्पष्ट होईल.
वाचा- Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
- वेंगुर्ला नगरपालिकेत भाजप नगराध्यक्ष राजन गिरप आघाडीवर आहेत. तर आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार एकूण 4 जागापैकी भाजप 3 तर शिंदे सेना 1 जागेवर आघाडीवर आहेत.
- कणकवलीत नगराध्यक्ष पदासाठी मोठी चुरस सुरु आहे. भाजपचे समीर नलावडे यांना 1461 मते तर शहर विकास आघाडी संदेश पारकर 1464 यांना मते मिळाली आहेत. आतापर्यंत आलेल्या मतमोजणीनुसार शहर विकास आघाडी संदेश पारकर केवळ ३ मतांनी आघाडीवर आहेत.
- मालवणमध्ये मतमोजणीस सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत नगराध्यक्ष पदासाठी शिंदे सेनेच्या ममता वराडकर १७२ मतांनी आघाडीवर आहेत. पूजा करलकर यांना 689 मते, शिल्पा खोत यांना 809 तर ममता वराडकर 981 मते मिळाली आहेत.