संजय राऊत न्यायालयात

By Admin | Updated: June 7, 2015 00:46 IST2015-06-07T00:43:40+5:302015-06-07T00:46:02+5:30

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी हजेर

Sanjay Raut in court | संजय राऊत न्यायालयात

संजय राऊत न्यायालयात

कुडाळ : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी शुक्रवारी कुडाळ न्यायालयात हजेरी लावली.
सन २००९च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे कुडाळ येथे आले होते. यावेळी प्रचारादरम्यान त्यांच्याकडून आचारसंहितेचा भंग झाल्याचा ठपका ठेवत कुडाळच्या तत्कालीन तहसीलदारांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या कामासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता त्यांनी कुडाळ न्यायालयात हजेरी लावली. तेथील काम आटोपून ते पुन्हा मुंबई येथे रवाना झाले. (प्रतिनिधी)
 

 

Web Title: Sanjay Raut in court