शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

कोलझर येथील साबाजी सावंत : अंध:कारमय जीवनात प्रकाश किरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:47 AM

आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उदात्त भावनेतून तालुक्यातील अपंग व निराधार व्यक्तींना एकत्रित करून त्यांच्या अंध:कारमय जीवनात प्रकाशाचे किरण आणणारे दोडामार्ग तालुक्यातील कोलझर येथील साबाजी सावंत सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आदर्श ठरत आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून स्वत:ची पदरमोड करीत आर्थिक विषमतेची कवाडे बाजूला सारून अपंग आणि निराधारांसाठी त्यांचे सुरू असलेले कार्य थक्क करणारे आहे.

ठळक मुद्देकोलझर येथील साबाजी सावंत : अंध:कारमय जीवनात प्रकाश किरणअपंग, निराधारांसाठीचे कार्य थक्क करणारे सावंत

वैभव साळकरदोडामार्ग : आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उदात्त भावनेतून तालुक्यातील अपंग व निराधार व्यक्तींना एकत्रित करून त्यांच्या अंध:कारमय जीवनात प्रकाशाचे किरण आणणारे दोडामार्ग तालुक्यातील कोलझर येथील साबाजी सावंत सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आदर्श ठरत आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून स्वत:ची पदरमोड करीत आर्थिक विषमतेची कवाडे बाजूला सारून अपंग आणि निराधारांसाठी त्यांचे सुरू असलेले कार्य थक्क करणारे आहे.तळकट पंचक्रोशीतील कोलझरसारख्या ग्रामीण भागात सामाजिक कार्य करीत असताना साबाजी सावंत यांना अनेक अनुभव आले. अपंग आणि निराधार व्यक्तींना जीवन जगत असताना आयुष्याचा गाडा चालविण्यासाठी कोणकोणत्या कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते, याची प्रचीती त्यांना आली आणि तेव्हाच त्यांनी तालुक्यातील अपंग व्यक्ती आणि निराधारांना एकत्र करून त्यांच्यासाठी कार्य करण्याचा निश्चय केला आणि आपल्या संकल्पपूर्ततेच्या दिशेने वाटचाल सुरू केली.गावागावात फिरत असताना एखादी व्यक्ती अपंग आहे, पण तिच्याकडे दाखला नाही आणि दाखला नसल्याने ती व्यक्ती शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकत नाही, असे अनेक प्रकार समोर आले. त्यामुळे सर्वात प्रथम त्यांनी तालुक्यातील अपंग व निराधार व्यक्तींना एकत्र करून संघटनाबांधणीच्या दृष्टीने प्रयत्न केले. तालुक्यात दिव्यांग बांधवांची संघटना होती खरी, पण ती म्हणावी तशी कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सावंत यांनी दिव्यांग सेवा संघ नावाची संघटना स्थापन करून तिला उर्जितावस्था देण्यास सुरूवात केली.

तालुक्यातील ९५७ दिव्यांग बांधवांना त्यांनी एकत्र केले. आणि ज्यांचे दाखले नव्हते, अशा दिव्यांग बांधवांचे प्रथम दाखले तयार केले. त्यानंतर त्यांनी निराधार महिलांना एकत्र आणण्याचा वसा घेतला. पतीच्या निधनानंतर निराधार महिलांना संसाराचा गाडा चालविताना येणाऱ्या अडीअडचणींची जाण असल्याने साबाजी सावंत यांनी तालुक्यातील १२०० निराधारांना एकत्रित आणून त्यांची संघटना तयार केली.निराधार महिलांसाठी भाऊबीज उपक्रमनिराधार महिलांना एकत्रित आणून त्यांच्या जीवनात प्रकाशमय वाटा तयार करण्याचा वसा घेतलेल्या साबाजी सावंत यांनी निराधार महिलांसाठी दिवाळीमध्ये भाऊबीज कार्यक्रम राबविला. नि:स्वार्थी भावनेने समाजात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या मदतीने त्यांनी निराधार महिलांना साड्या भेट देऊन भाऊबीजेचा आगळावेगळा कार्यक्रम राबवून त्यांच्याही आयुष्यात सणासुदीचा आनंद मिळवून देण्याचे काम केले. तसेच दिव्यांगांसाठी प्रकाशाचे प्रतीक असलेले निरांजन भेट देऊन आगळीवेगळी दिवाळी दिव्यांग बांधवांसाठी साजरी केली.दिव्यांगांच्या बचतगटाची स्थापनादिव्यांग व निराधार महिलांना बचतीचे महत्त्व पटावे, त्यांनी कोणावर अवलंबून राहू नये, यासाठी साबाजी सावंत यांनी दिव्यांग बांधवांच्या बचतगटाची स्थापना केली. आतापर्यंत पाच बचतगट त्यांनी स्थापन केले आहेत. एवढ्यावरच न थांबता त्यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांची भेट घेऊन दिव्यांगांसाठी तातडीची गरज भासल्यास दहा हजार रूपये कर्जाऊ रक्कम देण्यात यावी, अशी विनंती केली आणि त्यास मान्यताही मिळाली. 

टॅग्स :Tahasildarतहसीलदारsindhudurgसिंधुदुर्ग