शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाचे काम रोखले, खारेपाटण येथील घटना, ग्रामस्थ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 11:47 IST

मुंबई-गोवा महामार्ग क्र. ६६ च्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू असून, खारेपाटण येथील संभाजीनगर-गुरववाडी येथील ग्रामस्थांनी त्यांच्या असलेल्या समस्यांसाठी रोखले. याबाबत प्राधिकरणच्या वरिष्ठांना माहिती मिळाल्यानंतर कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अमोल ओटवणेकर यांनी तत्काळ ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महामार्गाचे काम पूर्ववत सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देमहामार्गाचे काम रोखले, खारेपाटण येथील घटना संभाजीनगर-गुरववाडीतील ग्रामस्थ आक्रमक

खारेपाटण : मुंबई-गोवा महामार्ग क्र. ६६ च्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू असून, खारेपाटण येथील संभाजीनगर-गुरववाडी येथील ग्रामस्थांनी त्यांच्या असलेल्या समस्यांसाठी रोखले. याबाबत प्राधिकरणच्या वरिष्ठांना माहिती मिळाल्यानंतर कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अमोल ओटवणेकर यांनी तत्काळ ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महामार्गाचे काम पूर्ववत सुरू करण्यात आले.यावेळी खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, उपसरपंच ईस्माईल मुकादम, ग्रामपंचायत सदस्य व गुरववाडी संभाजीनगर ग्रामस्थ महेंद्र गुरव, शमशुद्दीन काझी, शंकर राऊत, योगेश पाटणकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, ग्रामविकास अधिकारी आर. जी. वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते. ओटवणेकर व महामार्ग प्राधिकरणचे रणधीरकुमार चतुर्वेदी यांच्याशी खारेपाटणवासीयांनी चर्चा करून आपल्या विविध समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. या सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन ओटवणेकर यांनी ग्रामस्थांना दिले.चौपरीकरण कामात रस्ता तोडला; ग्रामस्थांनी मांडल्या विविध समस्याखारेपाटण टाळेवाडी येथील महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने बांधण्यात आलेल्या लिशा रिसॉर्ट या इमारतीकडे जाणारा रस्ता चौपदरीकरणाच्या कामात तोडल्याने या रिसॉर्टकडे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे तो रस्ता बनविण्यात यावा, अशी मागणी सरपंच राऊत यांनी केली. तसेच खारेपाटण महामार्गावरील नृसिंह मंदिर येथून कालभैरव मंदिराकडे पायवाट जात असल्यामुळे येथे दुभाजक न ठेवता रस्ता बनविण्यात यावा, अशी मागणीही राऊत यांनी केली. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग