शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

महसूल प्रकरणी चौकशी व्हावी, मनसेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 16:11 IST

highway, mns, sindhudurgnews महामार्ग अधिकारी व कंपनी प्रतिनिधी यांनी संगनमतातून जिल्ह्याचा जवळपास ८० ते ९० कोटी रुपयांचा महसूल बुडवला असल्याने सखोल चौकशीची मागणी मनसेने केली आहे.

ठळक मुद्देमहसूल प्रकरणी चौकशी व्हावी, मनसेची मागणी अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष झाल्याचा आरोप

ओरोस : महामार्ग अधिकारी व कंपनी प्रतिनिधी यांनी संगनमतातून जिल्ह्याचा जवळपास ८० ते ९० कोटी रुपयांचा महसूल बुडवला असल्याने सखोल चौकशीची मागणी मनसेने केली आहे.

सामान्य जनतेकडून महसूल वसुलीसाठी कर्तव्यदक्षपणा दाखवणारे अधिकारी धनदांडग्या कंपनीच्या बाबतीत मूग गिळून गप्प का? जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कंत्राटदारांना अच्छे दिनह आले असल्याचे आरोप करत आज निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांना निवेदन देत याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे.दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या सुधारणा व रुंदीकरण उपक्रमांतर्गत शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडीत गेल्याचे चित्र सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पहायला मिळत आहे. यामध्ये स्वामित्वधन, भूपृष्ठ भाडे, सरफेस वॉटर रेंट (पाणीपट्टी) अशा घटकांचा समावेश आहे.

महाराष्ट्र शासनाने दिलेल्या परिपत्रकानुसार प्रकल्पाच्या मूळ अंदाजपत्रकानुसार गौण खनिज परिमाण तपशील सादर करून आगाऊ महसूल भरणा करण्याचे निर्देश दिलेले असताना देखील सिंधुदुर्ग जिल्हा महसूल प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले व यामध्ये कंत्राटदाराशी आर्थिक साटेलोटे असण्याची दाट शक्यता असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

२६०० ,कोटी रुपयाच्या कलमठ ते झाराप या रस्त्यासाठी फक्त २१ कोटी रुपये महसूल वसुली झाली आहे. ही बाब मुळात संशयास्पद आहे. डोंगरच्या डोंगर उद्ध्वस्त करून जिल्ह्याची पर्यावरण हानी करणाऱ्या कंत्राटदारांना जिल्हा महसूल प्रशासन पाठीशी का घालत आहे, याची चौकशी व्हावी. या संदर्भातील सखोल चौकशीसाठी मनसेच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.जिल्ह्याचा ८० कोटींचा महसूल बुडाल्याचा आरोपअधिकारी व कंपनी प्रतिनिधी यांनी संगनमतातून जिल्ह्याचा जवळपास ८०ते ९० कोटी रुपयांचा महसूल बुडवला असल्याने सखोल चौकशीची मागणी केली आहे.सदर निवेदनात उत्खनन झालेल्या ठिकाणांची तपासणी प्रणालीद्वारे पुनर्रमोजणी करण्यात यावी, काम सुरू झाल्यापासून आजपर्यंतचे उत्खनन क्षेत्रातील भूपृष्ट भाडे वसूल करण्यात यावे. प्रकल्पाच्या कामकाजासाठी वापरण्यात आलेल्या पाण्यासाठी पाणीपट्टी वसुलीची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, अशा मागण्या मनसेने जिल्हा प्रशासनासमोर ठेवल्या आहेत. मनसेने उपस्थित केलेल्या मुद्यांवर तत्काळ अहवाल घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनी दिले. 

टॅग्स :MNSमनसेhighwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग