Sindhudurg: कोळोशी येथे सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याची हत्या, संशयित ताब्यात
By सुधीर राणे | Updated: November 28, 2024 12:10 IST2024-11-28T12:10:09+5:302024-11-28T12:10:29+5:30
कणकवली : तालुक्यातील कोळोशी, वरचीवाडी येथे सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याची हत्या झाली आहे. आज, गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. ...

Sindhudurg: कोळोशी येथे सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याची हत्या, संशयित ताब्यात
कणकवली : तालुक्यातील कोळोशी, वरचीवाडी येथे सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याची हत्या झाली आहे. आज, गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. विनोद मधुकर आचरेकर (वय ५६) असे त्यांचे नाव आहे. मात्र, हत्येमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
विनोद आचरेकर मुंबई पोलिस दलात कार्यरत होते. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर गेले दोन दिवस ते एकटेच आपल्या कोळोशी, वरचीवाडी येथील घरी राहण्यास आले होते. गुरुवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्यावर मोठ्या जखमा आहेत.
दरम्यान, आचरेकर यांच्या मृत्यूची माहिती पोलिस पाटील संजय गोरुले यांनी कणकवली पोलिसांना दिली. त्यानंतर कणकवली पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ करीत आहेत.