शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रप्रमुख पदे कायम

By admin | Updated: July 23, 2014 21:56 IST

सुरेश पेडणेकर : विधानसभा अध्यक्षांनी दिले आश्वासन

कणकवली : संपूर्ण महाराष्ट्रात १० जून २०१४ पूर्वी तात्पुरती तसेच अभावितपणे भरण्यात आलेली केंद्रप्रमुख पदे कायम करण्यात येतील. असे आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती संघटनेचे सल्लागार सुरेश पेडणेकर यांनी दिली.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १४ नोव्हेंबर १९९४ च्या शासन निर्णयानुसार राज्यात प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी ४८६० केंद्रप्रमुखांची पदे निर्माण केली. ही पदे १०० टक्के पदोन्नतीने भरण्याची शासन निर्णयात तरतूद होती. गेली २० वर्षे ही पदे कार्यरत असून ती १०० टक्के पदोन्नतीने भरण्यात येत होती. परंतु २ फेब्रुवारी २०१० च्या शासन निर्णयानुसार ही पदे ४० टक्के सरळसेवेने, ३० टक्के विभागीय स्पर्धा परीक्षेने तर उर्वरित ३० टक्के पदोन्नतीने अशी करण्यात आली. मात्र या शासन निर्णयात याची कार्यप्रणाली दिलेली नसल्यामुळे या शासन आदेशाची कार्यवाही होऊ शकली नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात केंद्रप्रमुखांची अनेक पदे रिक्त राहिली. त्याचा ताण प्रशासनावर व शैक्षणिक कामकाजावर होऊ लागल्याने २५ जून २०१० रोजी पुन्हा एकदा आदेश काढण्यात आला. यामध्ये १ फेब्रुवारी २०१० पूर्वी रिक्त असणारी सर्व केंद्रप्रमुखांची पदे पूर्वीच्या पद्धतीने भरण्यासाठी परवानगी दिली. ही पदे भरूनसुद्धा विशिष्ट तारखेच्या मर्यादेमुळे अनेक पदे रिक्त राहिली आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणेच्या संचालकांनी २९ नोव्हेंबर २०१२ च्या पत्रानुसार सर्व रिक्त पदे तात्पुरत्या तसेच अभावितपणे भरण्याची अनुमती दिली. त्याप्रमाणे काही जिल्हा परिषदांनी त्या पत्रापूर्वी तर काही जिल्हा परिषदांनी त्या पत्रानंतर आपल्याकडील १०० टक्के रिक्त पदे पदोन्नतीने भरली. (वार्ताहर) -दरम्यान, महाराष्ट्र शासनाने केंद्रप्रमुखांची पदे ४०:३०:३० अशी केल्याची अधिसूचना १० जून २०१४ रोजी प्रसिद्ध केली. त्याचा परिणाम तात्पुरत्या स्वरूपात भरलेल्या केंद्रप्रमुखांवर होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा या संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी १६ जुलै रोजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची त्यांच्या दालनात भेट घेतली व लेखी निवेदन सादर केले. यावेळी दिलीप वळसे-पाटील यांनी आश्वासन दिले. तसेच शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून केंद्रप्रमुख पदे कायम करण्याची विनंती केली. संघटनेचे राज्याध्यक्ष दत्तात्रय सावंत तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते, असेही या पत्रकात म्हटले आहे.