शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
3
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
4
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
5
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
6
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
7
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
8
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
9
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
10
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
11
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
12
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
13
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
14
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
15
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
16
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
17
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
18
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
19
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
20
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?

समर्थ हत्तीचा औषधोपचारांना प्रतिसाद

By admin | Updated: April 28, 2015 00:21 IST

पायाच्या जखमेवर उपचार : बेल्टसह क्रेनचा वापर सुरूच

माणगाव : क्रेनच्या सहाय्याने आधार दिलेल्या समर्थ हत्तीच्या प्रकृतीत सुधारणा होत असून रविवारी रात्री त्याने झोपून विश्रांती घेतली. सोमवारी सकाळी त्याला उठविण्यासाठी पुन्हा क्रेनचा वापर करावा लागला. बेल्टच्या सहाय्याने थोडासा आधार देताच समर्थ चुटकीसरशी पुन्हा उभा राहिला. त्याच्या पायावर जखमेवर औषधोपचार सुरू आहेत. गेला आठवडाभर समर्थ हत्तीच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने तो मंद होता. सकाळी उठण्यासाठी त्याला सलाईन लावावी लागत होती. मात्र, रविवारी नेहमीपेक्षा क्रेनचा आधार घेत उठला असला, तरी त्याच्या प्रकृतीचा धोका टळला असल्याचे वनविभागाने सांंगितले. समर्थच्या आजारपणामुळे वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी मात्र आंबेरी येथे त्याच्या देखरेखीसाठी ठाण मांडून आहेत. त्याच्या खाण्यापिण्यासह प्रात:विधीचा काटेकोरपणे नमुना घेणे, त्याला वेळच्यावेळी पाणी, औषधे व विशेष म्हणजे बेलडेमाड, मक्याची झाडे असे जीवनसत्व मिळणारे खाद्य जास्त प्रमाणावर देण्याची प्रक्रिया वनविभागाने चालू ठेवली आहे. त्याचप्रमाणे डॉ. उमाशंकर यांचे सहाय्यक करिमभैय्या व बाबुराव मोरे आंबेरी येथे हत्तीच्या तब्येतीची विशेष काळजी घेत आहेत.समर्थ हत्तीची प्रकृती शनिवारी खूपच खालावल्याने प्रभारी उपवनसंरक्षक प्रकाश बागेवाडी, सहाय्यक उपवनसंरक्षक एस. पी. बागडी, वनक्षेत्रपाल संजय कदम, वनपाल रामकृष्ण सातव यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी हवालदिल झाले होते. रविवारी क्रेनच्या सहाय्याने समर्थला उभे करण्यात आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकत त्याची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी सकाळी क्रेनचा आधार घेऊन उठला असला तरी सोंडेने अंगावर पाणी उडवून घेऊन तरतरीत झाल्याचे दिसत होते. दरम्यान, समर्थ हत्तीची तब्येत खालावल्याने वन विभागाने गांभीर्य ओळखून कर्नाटक येथील करिमभैय्या व बाबुराव मोरे यांना पाचारण केले असल्याने समर्थच्या जीवाचा धोका टळला आहे. या घटनेने अनेक लोकप्रतिनिधींनी आंबेरी येथे भेट देत वनविभागाला फुकटच्या सूचनाही केल्या. तज्ज्ञ डॉक्टर आणा, खाद्य भरपूर द्या, अशा सूचना देण्यापेक्षा सध्या हत्तीच्या खाण्यापिण्याचा दिवसाचा खर्च सुमारे दहा हजार एवढा आहे. शासनस्तरावर आर्थिक तरतूद झाली नसल्याने अधिकारी आपल्या क्रेडिटवर धान्य, खाद्य, औषधे व क्रेन व इतर वाहने आणित आहेत. लोकप्रतिनिधींनी भेट देताना हत्तीचे खाद्य व औषधेही आणून सहकार्य करावे, अशी सूचना प्राणीमित्रांनी केली आहे. (प्रतिनिधी)