शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतीसाठी प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: August 2, 2015 20:41 IST

दोडामार्गकडे सर्वांचे लक्ष : पहिल्याच निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीस वेग

वैभव साळकर - दोडामार्ग  -तालुक्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच होणाऱ्या कसई दोडामार्ग नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात भाजपसोबत सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. तर भाजप तूर्तास सावधगिरीने घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आघाडी करण्याच्या सकारात्मकतेत आहेत. दरम्यान, नगरपंचायत झाल्यानंतर पहिलीच निवडणूक असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीसह सेना-भाजपासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. तत्कालीन काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात तालुका ठिकाणची ग्रामपंचायत नगर पंचायतीत रुपांतरीत करण्याचा अध्यादेश निघाला होता. त्याची अंमलबजावणी सेना-भाजपा युतीच्या काळात होत असून, त्या अनुषंगानेच कसई दोडामार्ग ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रुपांतर झाले आहे. पूर्वी ११ सदस्यसंख्या होती. नगरपंचायत झाल्याने ही संख्या १७ वर पोहोचली आहे. शिवाय वॉर्ड रचनादेखील बदलणार असून, प्रत्येकी एका वॉर्डमधून एकच उमेदवार निवडून येणार आहे. त्यामुळे १७ वॉर्डमध्ये १७ उमेदवार शोधण्याचे काम राजकीय पक्षांना करावे लागणार आहे. तालुक्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच नगरपंचायतीची निवडूक असल्याने तालुक्यातील सेना-भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी ती प्रतिष्ठेची बनली आहे. नगर पंचायतीच्या या लगीनघाईत शिवसेना सगळ्यात पुढे असून, नुकत्याच पार पडलेल्या सेनेच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे तालुकाध्यक्ष बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीवर भगवा फडकविण्याची धुरा उपतालुकाध्यक्ष गोविंद महाले, शहराध्यक्ष शाणी बोर्डेकर, शाम खडपकर, विनायक मणेरीकर व जीवन सावंत यांच्यावर राहणार आहे. आपल्या मित्रपक्षाने जाहीर केलेल्या स्वबळाच्या भूमिकेवर एरव्ही गळ्यात गळा घालून राज्यात वावरणाऱ्या भाजपाने मात्र आपली कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. सध्या भाजपाची नेतेमंडळी सावध भूमिकेत असून, इतर राजकीय पक्षांच्या घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहेत. याठिकाणी सेनेपेक्षा भाजपाचे पारडे जड दिसत असून शहराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्यावर निवडणुकीत मोठी धुरा असणार आहे. जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर आणि तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस यांच्या कल्पक नेतृत्वामुळे भाजप निवडणुकीत चांगलीच रंगत आणू शकेल. शिवाय कें द्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने त्याचा फायदा सत्ताधारी म्हणून भाजपाला काही प्रमाणात होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर गळ्यात-गळा घालून असून निवडणुकीत आघाडी करण्यासाठी सकारात्मक आहे. तशा वाटाघाटीदेखील पडद्यामागून सुरू आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला ही निवडणूक म्हणावी तशी कठीण जाणार नाही. शिवाय गेली अडीच वर्षे ग्रामपंचायतीची ही सत्ता काँग्रेसकडे होती. काँग्रेसचे युवा सरपंच म्हणून संतोष नानचे यांनी कसई दोडामार्ग शहरात चांगलीच छाप पाडली आहे. रस्ते, पाणी, आरोग्य आदी विविध क्षेत्रात लाखो रुपयांची विकासकामे शहरासाठी आणून कसई दोडामार्गवासीयांना अच्छे दिन आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविताना गेल्या अडीच वर्षात झालेल्या लाखो रुपयांच्या विकासकामांचा फायदा काँग्रेसला होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय राष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी देखील राजकारणात सक्रीय झाले आहेत. दळवींना मानणारा जुनाजाणता वर्ग आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची साथ काँग्रेसला अधिक बळकटी आणणारी ठरेल. एकंदरीत नगरपंचायतीची ही तालुक्यातील पहिलीच निवडणूक असल्याने रणनीती आखताना राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींची धावपळ उडणार असून, ही निवडणूक प्रत्येकाचे अस्तित्व दाखवून ठेवणारी ठरणार आहे.उमेदवार शोधताना...कसई दोडामार्ग ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रुपांतर झाल्यानंतर प्रथमच निवडणूक होत असल्याने वार्ड रचनाही बदलण्यात आली आहे. पूर्वी चार वार्डात होणारी ग्रामपंचायत निवडणूक आता नगर पंचायतीनंतर १७ वार्डात होणार आहे. या १७ वार्डात १७ उमेदवार आरक्षणानुसार शोधण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर असणार आहे. शिवाय ५० टक्के महिलांना आरक्षण असल्याने १७ मधील किमान आठ सदस्य या महिला उमदेवार असणार आहेत. त्यामुळे महिला उमेदवार शोधताना सर्वच राजकीय पक्षांची दमछाक होणार आहे.