शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट शहराच्या यादीत रत्नागिरीच्या तोंडाला पाने

By admin | Updated: August 1, 2015 00:37 IST

रत्नागिरी : अंतिम दहा शहरांच्या यादीतून रत्नागिरीचे नाव गायब

रत्नागिरी : देशातील १०० शहरांना स्मार्ट शहर बनवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर त्यासाठी राज्यातील ३० पालिकांची प्राथमिक फेरीत निवड झाली. त्यातून निवडक, सक्षम तसेच सर्व निकष पूर्ण करणाऱ्या दहा शहरांची यादी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. त्यात रत्नागिरी नगरपालिकेचा समावेश नसल्याने रत्नागिरीच्या विकासावर मर्यादा येणार आहेत.विविध अटींबरोबरच स्मार्ट शहरासाठी लोकसंख्येची अटही घालण्यात आली होती. यातील बहुतांश निकषांच्या पातळीवर रत्नागिरी पालिका आघाडीवर होती. मात्र, लोकसंख्येचा निकष पूर्ण होत नव्हता. स्मार्ट शहरासाठी १ लाख लोकसंख्येची अट घालण्यात आली होती. २०११च्या जनगणनेनुसार रत्नागिरी शहराची लोकसंख्या ७६ हजार आहे. त्यामुळे स्मार्ट शहराच्या स्पर्धेत रत्नागिरी टिकेल की नाही, याबाबत आधीपासूनच शंका व्यक्त केली जात होती. राज्यातील ३० पालिकांनी स्मार्ट शहरासाठी आपले प्रस्ताव राज्य सरकारकडे मागणीनुसार सादर केले होते. कोकणातील रत्नागिरी व पनवेल या दोन पालिकांकडूनही असे प्रस्ताव शासनाने मागविले होते. आठवड्यापूर्वीच मंत्रालयातील शहर विकास विभागाच्या सचिवांनी स्मार्ट शहरासाठी ३० प्रस्ताव आले असून, छाननीअंती त्यातील १० प्रस्तावाची अंतिम यादी ३१ जुलै २०१५ रोजी जाहीर होणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार आज या दहा शहरांची नावे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, मुंबई, अमरावती, सोलापूर, नागपूर, कल्याण-डोंबिवली आणि औरंगाबाद या शहरांचा समावेश आहे. रत्नागिरी पालिकेकडून राज्य शासनाने प्रस्ताव मागविल्याने गेले दोन महिने आवश्यक निकषांची पुर्तता किती व कशी होणार याबाबत विचारमंथन सुरू होते. प्रस्ताव तयार करण्यासाठी बैठका झाल्या. प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. त्याबाबतच्या मार्गदर्शनासाठी दिल्लीतील देशव्यापी मार्गदर्शन शिबिरालाही नगराध्य्ाक्ष व अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. मात्र हे सारे प्रयत्नच फोल गेल्याने रत्नागिरीकरांची आशा धुळीस मिळाली. (प्रतिनिधी)कोकण विभाग उपाशी...स्मार्ट शहर प्रकल्पासाठी शहरांची निवड करताना राज्यातील नागपूर, अमरावती, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सहा महसुली विभागांना अंतिम १० शहरांच्या यादीत प्रतिनिधीत्व देण्यात येणार असल्याचे जाहीर झाले होते. त्यामुळे कोकण विभागातून पनवेल व रत्नागिरी या दोन शहरांपैकी किमान एका शहराला अंतिम यादीत स्थान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. प्रत्यक्षात कोकणच्या हाती काहीच लागले नाही. उलट विकसित असलेल्या मोठ्या शहरांनी बाजी मारली.