शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी शहर एलईडी पथदीपांनी उजळणार !

By admin | Updated: September 5, 2014 23:26 IST

पालिकेच्या येत्या सभेत होणार निर्णय : नाशिकच्या कंपनीकडून मोफत प्रकल्प; वीजबिलात होणार ३० टक्के कपात

प्रकाश वराडकर - रत्नागिरी --शहरातील साडेचार हजार पथदीपांची जागा ३६ ते ४० वॅटचे एलईडी पथदीप घेणार आहेत. त्यामुळे रत्नागिरी शहर या एलईडी दीपांनी उजळून निघणार आहे. हे पथदीप मोफत देण्याची तयारी नाशिक येथील ‘करंट टेक्नॉलॉजीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने दाखविली आहे. रत्नागिरीसह राज्यातील चार शहरांची या कंपनीने या योजनेसाठी निवड केली आहे. एलईडी बल्बमुळे पालिकेचे वीजबिलही कमी येणार आहे. पालिकेच्या येत्या सभेत याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.रत्नागिरी शहरात पालिकेतर्फे देखभाल केले जाणारे व महावितरणकडून देखभाल होणारे असे साडेचार हजार पथदीप आहेत. या सर्व पथदीपांची जागा हे एलईडी पथदीप घेणार आहेत. साधारणपणे ३६ ते ४० किंवा अन्यत्र आवश्यकतेनुसारच्या क्षमतेचे एलईडी बसविण्याची कंपनीची तयारी आहे. सध्या पालिकेला दर महिन्याला पथदीपांच्या विजेसाठी १२ लाखांचे बिल महावितरणला अदा करावे लागते. एलईडी पथदीप बसविल्यानंतर या वीजबिलात ३० टक्के कपात होणार आहे. हा पालिकेचा फायदाच असून, सात वर्षे ही कमी झालेली बिलाची रक्कम या कंपनीला द्यावी लागणार आहे. सात वर्षांत पथदीपांची देखभाल पूर्णत: कंपनी पाहणार आहे. या योजनेतील सर्व पथदीपांचा खर्च ही कंपनीच करणार आहे. प्रत्येक पथदीपासाठी किमान सहा ते आठ हजारांचा खर्च अपेक्षित असून, साडेचार हजार पथदीपांचा खर्च कंपनीच करणार असल्याने पालिकेसाठी हा प्रकल्प वरदायी ठरणार असल्याचे मयेकर म्हणाले. एवढ्या मोठ्या खर्चाचा प्रकल्प राबविताना कंपनी त्याचा उभारणी खर्च स्वत:च उचलणार आहे, यामागे नेमके काय कारण आहे, असे विचारता मयेकर म्हणाले, एलईडी दिव्यांना पावसाच्या पाण्यामुळे समस्या येते, असा सार्वत्रिक समज आहे. त्यामुळे सर्वाधिक पाऊस असलेल्या कोकणातील रत्नागिरी शहरात हा प्रकल्प राबवून तो यशस्वी करून दाखविण्याचा कंपनीचा मानस आहे. याद्वारे राज्यातील व देशातील अन्य भागांना या प्रकल्पाचा आदर्श घालून देण्याचा कंपनीचा मानस आहे.