शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

राणेंचा भाजपा प्रवेश कोअर कमिटीचा निर्णय :प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 15:56 IST

भारतीय जनता पार्टीत नारायण राणे यांच्या प्रवेशाबाबत राज्य कोअर कमिटीत निर्णय होईल. प्रदेशकडून जो निर्णय घेतला जाईल त्याची अंमलबजावणी करण्याचे काम जिल्हाध्यक्ष म्हणून मी करणार आहे. कोकणात २०२४ पर्यंत शत-प्रतिशत भाजपा करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील.

ठळक मुद्देराणेंचा भाजपा प्रवेश कोअर कमिटीचा निर्णय :प्रमोद जठारपक्षातील नेत्यांनी विचलित होण्याची गरज नाही

कणकवली : भारतीय जनता पार्टीत नारायण राणे यांच्या प्रवेशाबाबत राज्य कोअर कमिटीत निर्णय होईल. प्रदेशकडून जो निर्णय घेतला जाईल त्याची अंमलबजावणी करण्याचे काम जिल्हाध्यक्ष म्हणून मी करणार आहे. कोकणात २०२४ पर्यंत शत-प्रतिशत भाजपा करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील.जनसंघाच्या शिकवणीप्रमाणे जसे असतील तसे घ्या आणि त्यांना आपल्याला हवे तसे घडवा या धोरणाप्रमाणे जो कोण भाजपात प्रवेश करेल त्याचे स्वागत असेल. त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांनी विचलित होण्याची गरज नाही. सर्वांचा विचार करूनच पक्षहिताचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी स्पष्ट केले.कणकवली येथील भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष शिशिर परूळेकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र शेट्ये, डॉ. अरविंद कुडतरकर, संतोष पुजारे, समर्थ राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.भारतीय जनता पार्टीच्या अजेंड्यानुसार जे काम करतील त्यांना सोबत घेऊन पुढील संघटनात्मक बांधणी होणार आहे. कोकणातील परिस्थिती पाहता राज्य कोअर कमिटी पक्ष प्रवेशाचा निर्णय घेईल. राणेंच्या भाजपा प्रवेशाला संदेश पारकर यांनी विरोध केला असून राणेंचा पक्ष प्रवेश झाला तर ते सिंधुदुर्ग भाजपा हायजॅक करतील अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, ह्यसंदेश पारकर यांचे भाजपातील वय काय?ह्ण भाजप हायजॅक करायला हा पक्ष लेचापेचा नाही, असे जठार यांनी सांगितले.नाणार प्रकल्प हा १ लाख कुटुंबीयांच्या घरात चूल पेटवण्यासाठी व्हावा अशी आमची इच्छा आहे. कोकणातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. नाणार प्रकल्पात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांनी ८ हजार एकर जमिनीची संमतीपत्रे मुख्यमंत्र्यांकडे दिलेली आहेत.

या प्रकल्पासाठी १३ हजार एकर जमीन आवश्यक आहे. ६० टक्के जमीन शासनाला मिळत असल्याने आणि हजारो प्रकल्प समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून प्रकल्प करण्यासाठी भूमिका घेतली आहे. त्यामुळे नाणार प्रकल्पाबाबत समर्थकांशी चर्चा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले़ आहे.खासदार विनायक राऊत यांनी आपला विजय भाजपाच्या दीड ते दोन लाख मतांमुळे झाला हे विसरू नये. प्रकल्पाला विरोध करून बेरोजगार तरुणांची विनाकारण एकप्रकारे हत्या करू नये. ह्यपाठीवर मारा , पण पोटावर कोणाच्या मारू नकाह्ण. कोकणातील तरुण तुम्हांला माफ करणार नाहीत. प्रकल्पाला विरोध करून तरुणांची माथी भडकविण्यापेक्षा त्यांच्या घरातील चुली पेटविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा.प्रकल्पामुळे येथे जर परप्रांतीय येतील असे तुम्हांला वाटत असेल तर त्यावर चर्चा करा. मुंबईत तुमची सत्ता आहे. मग आता परप्रांतीयांची मुंबई झाली आहे. त्याला कोण जबाबदार? असा टोलाही जठार यांनी लगावला.

टॅग्स :Pramod Jatharप्रमोद जठारsindhudurgसिंधुदुर्ग