शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

राजकीय श्रेयासाठीच राणेंची ही केविलवाणी धडपड; संदेश पारकर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 4:17 PM

महामार्ग चौपदरीकरण कामामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्याचा जनतेला त्रास होत आहे . हे सत्य आहे. मात्र, कायदा हातात घेऊन प्रश्न सुटणार नाहीत. आमदार नितेश राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर केलेली चिखलफेक निषेधार्ह आहे. जनतेच्या प्रश्नासाठी आपण काही तरी करीत आहोत .हे दाखविण्यासाठी तसेच निव्वळ राजकीय श्रेयासाठीच त्यांची ही केविलवाणी धडपड आहे. अशी टीका कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी येथे केली.

ठळक मुद्देराजकीय श्रेयासाठीच राणेंची ही केविलवाणी धडपड; संदेश पारकर यांची टीकाउपअभियंता चिखलफेक प्रकरणाचा निषेध

कणकवली : महामार्ग चौपदरीकरण कामामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्याचा जनतेला त्रास होत आहे . हे सत्य आहे. मात्र, कायदा हातात घेऊन प्रश्न सुटणार नाहीत. आमदार नितेश राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर केलेली चिखलफेक निषेधार्ह आहे. जनतेच्या प्रश्नासाठी आपण काही तरी करीत आहोत .हे दाखविण्यासाठी तसेच निव्वळ राजकीय श्रेयासाठीच त्यांची ही केविलवाणी धडपड आहे. अशी टीका कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी येथे केली.कणकवली येथील भाजप कार्यालयात  आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष संदेश पटेल- सावंत उपस्थित होते. यावेळी संदेश पारकर म्हणाले, आमदार नितेश राणे यांच्यावर आतापर्यंत अनेक घटनांबद्दल विविध आरोप झाले आहेत. मत्स्य अधिकाऱ्यांवर बांगडा फेक करणे , चिरेखाण व्यावसायिकांच्या डंपर आंदोलनाच्यावेळी ओरोस येथे तोडफोड करणे, महामार्गाच्या प्रश्नांसाठी ज्येष्ठ नागरिकांना उपोषणाला बसवून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांशी गैरवर्तन करणे, अशी अनेक कृत्ये त्यांनी केली आहेत. दडपशाहीचा वापर करून व्यापाऱ्यांना बंद पुकारायला भाग पाडणे. हा जनतेला नाहक भुर्दंड आहे. कणकवली बंदच्या वेळी त्यांचे उद्योग धंदे मात्र सुरू होते. हा विरोधाभास का ?अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे, चिखल फेक करणे, त्यांना बांधून घालणे, गडनदी पूल ते प्रांत कार्यालयापर्यंत त्यांची धिंड काढणे .या सर्व गोष्टी निषेधार्ह अशाच आहेत. तसेच लोकशाहीला काळिमा फासणाऱ्याही आहेत. मात्र, सिंधुदुर्गातील सुज्ञ जनता असले प्रकार खपवून घेणार नाही. संबंधितांना मतपेटीतून ती उत्तर देईल. दडपशाही व दहशतीचे कृत्य करणाऱ्यांवर प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करावी.महामार्ग चौपदरीकरण कामाची माती कोणाच्या जमिनीत गेली ? कंत्राटे कोणाला मिळाली ? कोणाची भलावण करणाऱ्या जाहिराती कोणी दिल्या ? याबाबत जनतेला सर्व माहिती आहे. राणेंचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता परत विधानसभा निवडणुकीतही होऊ नये.यासाठीच जनतेची दिशाभूल करण्यासाठी आंदोलनाची ही स्टंट बाजी सुरू आहे.सिंधुदुर्गातील प्रशासनाने कोणाच्याही दबावाखाली राहण्याची गरज नाही. अधिकाऱ्यांना संरक्षण देणे ही राज्य व केंद्र शासनाच्या जबाबदारी आहे. त्यामुळे प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या मागे शासन व भाजप पक्ष खंबीरपणे उभे राहतील.स्टॉल धारक, व्यापारी , गाळे धारक, जमीन मालक अशा अनेक लोकांच्या त्यागातून हा महामार्ग साकार होत आहे. शहरी भागातील जमीन मालकांवर मोठा अन्याय झाला आहे. छोटे मोठे विक्रेते, व्यापारी, व्यावसायिक उध्वस्त झाले आहेत. त्यांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. जनमाणसाच्या भावनेचा आदर शासन व प्रशासनाने केला पाहिजे. मात्र, महामार्गाचे काम नियोजन शून्य पध्द्तीने सुरू आहे. मंत्री, खासदार, आमदार यांनी अनेक वेळा दौरे करून जनतेला आश्वासने दिली आहेत. ती पूर्ण करावीत आणि जनतेला दिलासा द्यावा .अशी आमची मागणी आहे. तिचा पाठपुरावा आम्ही करीत आहोत. असेही संदेश पारकर यावेळी म्हणाले...... तर उग्र आंदोलन करू !सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री दीपक केसरकर अशा मंत्र्यांनी महामार्ग चौपदरीकरण समस्या सोडविण्यासाठी काही निर्णय घेतले आहेत. त्याबाबत कृती तातडीने व्हावी. या समस्यांमुळे जनतेला त्रास होत असून तो दूर झाला नाही तर कायद्याच्या चौकटीत राहून उग्र आंदोलन करण्यात येईल. असेही यावेळी संदेश पारकर यांनी सांगितले.संसदीय मार्गाने आवाज का उठवला नाही?नारायण राणे राज्यसभा खासदार आहेत. त्यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलोख्याचे संबध आहेत. तर नितेश राणे आमदार आहेत. या दोघांनी लोकसभा तसेच विधानसभेत संबधित प्रश्न विचारून संसदीय मार्गाने आवाज का उठवला नाही? असा प्रश्न आता जनताच विचारू लागली आहे. असे संदेश पारकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Sandesh Parkarसंदेश पारकरsindhudurgसिंधुदुर्ग