शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

...तर राज ठाकरे पुन्हा करणार नाणार परिसराचा दौरा - नितीन सरदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 5:44 PM

नाणार प्रकल्पाला विरोध असला तर तो प्रकल्प गुजरात जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणणे म्हणजे दुर्दैव आहे. देशात एवढी राज्ये असताना मुख्यमंत्र्यांना गुजरातच का दिसते, असा सवाल मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी केला. राज ठाकरे यांनी एकदा नाणारला भेट दिलीच आहे. पण गरज पडल्यास आणखी एकदा भेट देतील, असेही यावेळी सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

- अनंत जाधवसावंतवाडी - नाणार प्रकल्पाला विरोध असला तर तो प्रकल्प गुजरात जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणणे म्हणजे दुर्दैव आहे. देशात एवढी राज्ये असताना मुख्यमंत्र्यांना गुजरातच का दिसते, असा सवाल मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी केला. राज ठाकरे यांनी एकदा नाणारला भेट दिलीच आहे. पण गरज पडल्यास आणखी एकदा भेट देतील, असेही यावेळी सरदेसाई यांनी स्पष्ट केले.मनसे नेते नितीन सरदेसाई हे शुक्रवारी पदाधिकाºयांच्या बैठकीसाठी सावंतवाडीत आले होते. त्यावेळी त्यांनी लोकमतशी संवाद साधला. यावेळी कामगार नेते मनोज चव्हाण, कोकणचे संपर्क नेते शिरिष सावंत, माजी नगरसेविका स्रेहल जाधव, जिल्हाध्यक्ष धीरज परब, राजन दाभोलकर, तालुकाप्रमुख गुरू गवडे, चैताली भेंडे आदी उपस्थित होते.मनसेचे नेते सरदेसाई म्हणाले, आम्ही सर्वजण सध्या संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करीत आहोत. मी स्वत: पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत प्रत्येक तालुक्यात जाऊन पदाधिका-यांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. या संपूर्ण दौ-याचा अहवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुपूर्द करणार असून, पक्ष संघटनेत फेरबदल करायचे का? याचा सर्वस्वी निर्णय राज ठाकरे घेणार आहेत. या बैठकीत आम्ही फक्त पदाधिका-यांचे म्हणणे ऐकून घेतले. कोणतीही भाषणबाजी केली नाही, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चार वर्षापूर्वी सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान गायले होते. मग आता काय झाले, यावर सरदेसाई म्हणाले, गुजरातमधील विकास आम्ही बघितला होता. तो बरा वाटला. मोदी देशात काही तरी चांगले करतील, असे वाटत होते. पण मागील चार वर्षात आमचाच नव्हे, तर देशाचा पूर्ण भ्रमनिरास झाला आहे. सर्व उद्योग गुजरातमध्ये नेण्याचे काम सुरू आहे. त्याला आमचा विरोध आहे. मोदी गुजरातचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत. तसे त्यांनी काम करणे गरजेचे असल्याचे मतही यावेळी सरदेसाई यांनी व्यक्त केले.नाणार प्रकल्पाला विरोध आहे. तो यापूर्वीच पक्षाध्यक्षांनी जाहीर केला आहे. त्यानंतर मुंबईत त्याची प्रतिकियाही उमटली. त्यामुळे नाणार होणार नाही. पण मुख्यमंत्री नाणारला विरोध असल्यास प्रकल्प गुजरातला जाईल, असे सांगत आहेत. त्यांना देशातील इतर राज्ये का दिसत नाहीत? गुजरातच का दिसते? असा सवाल सरदेसाई यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी गुजरातवरच प्रेम करू नये, असा सल्लाही यावेळी सरदेसाई यांनी दिला. तसेच यापूर्वी नाणारला राज ठाकरे येऊन गेले आहेत. मुंबईतही प्रकल्पग्रस्त भेटले. पण गरज पडल्यास पुन्हा एकदा राज ठाकरे नाणारमध्ये येतील, असेही यावेळी सरदेसाई यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र स्वाभिमानशी युतीचा निर्णय पक्षाध्यक्ष घेतीलस्थानिक निवडणुकीत कोणाशी युती करायची याचा अधिकार हा स्थानिक पातळीवर घेतला जातो. तसा निर्णय पिंगुळीतील निवडणुकीबाबत घेण्यात आला. याचा अर्थ सर्वच निवडणुकीत मनसे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाशी युती करेल असे नाही. मात्र याचे सर्व निर्णय पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे घेत असतात. मोठ्या निवडणुकीत काय करायचे ते पक्षप्रमुखच ठरवतील, असे यावेळी मनसे नेते सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेNitin Sardesaiनितीन सरदेसाईMaharashtraमहाराष्ट्र