कणकवली तालुक्यात पावसाचा कहर ! कणकवली-आचरा रस्त्यावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 01:39 PM2020-07-08T13:39:22+5:302020-07-08T13:40:03+5:30

कणकवली : कणकवली शहरासह तालुक्यात सलग सातव्या दिवशी पावसाची धुवाधार बरसात सुरू आहे.मंगळवारी दिवसभर जोरदार बरसल्यानंतर बुधवारीही सकाळपासूनच त्यात ...

Rainstorm in Kankavli taluka! Water on Kankavali-Achra road | कणकवली तालुक्यात पावसाचा कहर ! कणकवली-आचरा रस्त्यावर पाणी

कणकवली गडनदीवरील मराठा मंडळ येथील बंधाऱ्यावरून पाणी वाहत होते.

Next
ठळक मुद्देकणकवली तालुक्यात पावसाचा कहर ! कणकवली-आचरा रस्त्यावर पाणी गडनदी, जानवली नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ

कणकवली : कणकवली शहरासह तालुक्यात सलग सातव्या दिवशी पावसाची धुवाधार बरसात सुरू आहे.मंगळवारी दिवसभर जोरदार बरसल्यानंतर बुधवारीही सकाळपासूनच त्यात सातत्य राखले होते. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासात तालुक्यात सरासरी १३३ मिलिमीटर पावसाची नोंद येथील तहसील कार्यालयात झाली होती.

कणकवली आचरा रस्त्यावर सलग दुसऱ्या दिवशीही पाणी आले होते. त्यामुळे तो रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. सातरल - कासरल रस्ता , हरकुळ बुद्रुक -शिवडाव बंधारा पाण्याखाली गेला होता. तर कणकवली शहरालगत असलेल्या गडनदी व जानवली नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती.

पावसाच्या या कहरामुळे तालुक्यात नदि- नाले ओसंडून वाहू लागले आहेत. कणकवली शहरातील नाल्यांमधील पाण्याची पातळी वाढल्याने काहि घरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे नगरपंचायत कर्मचारी या एकंदर परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. काही ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा या कर्मचाऱ्यांनी केला. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

 

Web Title: Rainstorm in Kankavli taluka! Water on Kankavali-Achra road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.