शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

बागायतदारांचे प्रश्न मार्गी लावणार

By admin | Updated: July 29, 2015 22:01 IST

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : नियोजित रास्ता रोको स्थगित

रत्नागिरी : कोकणातील आंबा बागायतदारांचे प्रश्न सकारात्मक दृष्टीकोनातून मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. येत्या १५ दिवसात सहकार खात्याचे प्रधान सचिव कोकणात येऊन लोकप्रतिनिधी व बागायतदारांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतील, अशी ग्वाही दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनामुळे ३ आॅगस्ट रोजी हातखंबा येथे होणारे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे जिल्हा आंबा उत्पादक संघातर्फे जाहीर करण्यात आले आहे.रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी आंबा बागायतदार संघातर्फे मुख्यमंत्र्यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. जिल्ह्यातील आमदारही या बैठकीला उपस्थित होते.सहकार खात्याचे प्रधान सचिव आंबा शेतीच्या संदर्भातील नवीन तंत्रज्ञानाची तसेच नवीन विमा योजनासंदर्भातील माहिती देतील, असेही मुख्यमंत्री फडणीस यांनी सांगितले. शिवाय निवेदन वाचून यातील काही मागण्या प्रथमदर्शनी मान्य होण्यासारख्या असल्याचे सांगितले. त्यामध्ये हेक्टरी निकष न लावता प्रतिझाड लावण्याकरिता प्रयत्न केला जाईल. कर्जाचे त्वरित पुनर्गठण करण्याचे व शेतकऱ्यांना बँकांनी सहकार्य करण्याचे आदेश देण्यात येतील. यावर्षीचे कर्जावरील व्याज माफ करण्यात आले आहे. पुनर्गठीत कालावधीतकरिता व्याजदर सवलतीबाबत नक्कीच विचार केला जाईल. पीक विम्याचा हप्ता कमीत कमी व सुधारित निकष लावण्याचे आश्वासन देण्यात आले.पुनर्गठणासाठी बाधित शेतकऱ्यांच्या यादीऐवजी बँकेकडून कर्जदारांची यादी मागवून त्यांना पुनर्गठणाचा लाभ देण्यात येईल. नव्याने सर्वेक्षणाबाबत महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना याबाबत सांगण्यात येईल, असे सांगितले. परत गेलेली नुकसानभरपाईची रक्कम जिल्ह्याला नव्याने अदा करणेबाबत तसेच ७ टक्के व्याजदराने कर्ज मर्यादा २५ लाखांपर्यत देणे, इत्यादी विषयाकरिता उच्चस्तरीय सचिवांची बैठक येत्या ८ ते १५ दिवसात घेण्यात येईल. त्यावेळी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. ही बैठक जिल्हा पातळीवर व राज्य पातळीवर घेण्याचे आदेश यावेळी दिले.मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला जिल्हा संघातर्फे सचिव मंदार सरपोतदार, प्रदीप सावंत, प्रसन्न पेठे, राजेश पेडणेकर, पावस परिसर आंबा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश साळवी, राजू जाधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)े