शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देणे हाच हेतू

By admin | Updated: January 29, 2015 23:37 IST

बबन साळगावकर : देशभक्तीपर नृत्य स्पर्धेला चांगला प्रतिसाद

सावंतवाडी : दरवर्षी सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे देशभक्तीपर कार्यक्रम राबविले जातात. या कार्यक्रमांतून स्थानिक कलाकारांना भव्य व्यासपीठ मिळते आणि हाच याचा उद्देश असतो. मुलांनी या संधीचा फायदा घ्यावा व शिक्षकांनीही योग्य ते मार्गदर्शन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले. नगरपरिषदेच्या महिला व बालविकास समितीतर्फे देशभक्तीपर नृत्य स्पर्धा येथील बॅ. नाथ पै सभागृहात झाली. याप्रसंगी ते बोलत होते. मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, महिला व बालकल्याण सभापती वैशाली पटेकर, नगरसेवक अनारोजीन लोबो, कीर्ती बोंद्रे, संजय पेडणेकर, साक्षी कुडतरकर, अफरोज राजगुरू, आदी याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी सावंतवाडीतील शाळेतील मुलांनी देशभक्तीपर नृत्ये सादर केली. यामध्ये पहिली ते चौथी गटांत प्रथम क्रमांक मिलाग्रीस मराठी प्रायमरी स्कूल, द्वितीय जिल्हा परिषद शाळा नं. ४, तृतीय सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी शाळा, तर उत्तेजनार्थ जिल्हा परिषद शाळा नं. २ यांनी मिळविला. पाचवी ते सातवी या गटांत प्रथम कळसुलकर इंग्लिश स्कूल, द्वितीय जिल्हा परिषद शाळा नं. ४, तृतीय सेंट्रल स्कूल व उत्तेजनार्थ आरपीडी हायस्कूल यांनी मिळविला. आठवी ते दहावी गटांत प्रथम क्रमांक वि. स. खांडेकर विद्यालय, भटवाडी, द्वितीय मिलाग्रीस हायस्कूल, तृतीय आरपीडी हायस्कूल व उत्तेजनार्थ क्रमांक कळसुलकर हायस्कूलने मिळविला. याच दरम्यान २४ जानेवारी रोजी सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती शिवउद्यान येथे पहिली ते चौथीच्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम क्रमांक आर्य शिरसाट (मिलाग्रीस मराठी प्रायमरी स्कूल), द्वितीय अथर्व ज्ञानेश्वर सावंत (मिलाग्रीस मराठी प्रायमरी स्कूल), तृतीय पूर्वा शामसुंदर टोपले (मिलाग्रीस मराठी प्रायमरी स्कूल) उत्तेजनार्थ कृषी मेघनाथ लेले जिल्हा परिषद शाळा नं. २ यांनी मिळविला. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविणे स्पर्धेत पाचवी ते सातवी गटात मिलिंद पुरुषोत्तम कासार (आरपीडी हायस्कूल), आर्या आनंद कासार (शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल), आयोशा आमिन खालील (सेंट्रल इंग्लिश स्कूल) यांनी प्रथम तीन, तर शृजन हरिहर वाटवे (जिल्हा परिषद शाळा नं. ४) याने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. या सर्व विजयी मुलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली. या स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी नगरपरिषदेच्या कर्मचारी परवीन शेख यांनी मेहनत घेतली. (वार्ताहर)