शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

पं. राम मराठे संगीत स्पर्धेत चैतन्य परबची बाजी

By admin | Updated: January 29, 2015 23:34 IST

रत्नागिरीचा ठसा : संजीव अभ्यंकर यांच्याहस्ते बक्षीस वितरण

रत्नागिरी : पुण्यातील श्रीरंग कला निकेतनतर्फे आयोजित संगीतभूषण कै. पं. राम मराठे स्मृती संगीत राज्यस्तरीय स्पर्धेत शास्त्रीय गायनात चैतन्य परब याने प्रथम क्रमांक, तर सुगम संगीतात लहान गटात तृतीय क्रमांक मिळवत दुहेरी मुकुट पटकावला आहे. रत्नागिरीच्या ईशानी पाटणकर व रवींद्र सप्रे यांनीही सुयश प्राप्त केले आहे. विजेत्यांना प्रसिद्ध शास्त्रीय गायक संजीव अभ्यंकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.या राज्यस्तरीय स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला. चैतन्य परब याने शास्त्रीय गायन स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याने विलंबित एकतालमध्ये यमन राग सादर केला तर ‘काहे सखी कहे सखीकार’ बंदिश, तर ‘शाम बजाये आज मुरलिया’ ही द्रुत बंदिश सादर करून परीक्षकांची मने जिंकली. याचबरोबर सुगम संगीत प्रकारात लहान गटात तृतीय क्रमांक पटकावला आहे. यामध्ये त्याने ‘विसावा विठ्ठल’ हा अभंग सादर केला.रत्नागिरीच्याच ईशानी मनोज पाटणकर हिने नाट्यसंगीत प्रकारात लहान गटात उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. तिने ‘वद जाऊ कुणाला शरण’ हे नाट्यपद सादर केले. याचबरोबर रत्नागिरीच्याच रवींद्र सप्रे यांनी ज्येष्ठ वयोगटामध्ये सुगम संगीत प्रकारात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आहे.राज्यस्तरीय स्पर्धेचे यंदाचे ३०वे वर्ष होते. नुकतीच या स्पर्धेची अंतिम फेरी पुण्यामध्ये पार पडली. या स्पर्धेत गोवा, रत्नागिरी, पुणे, सांगली, कोल्हापूर, मुंबई, ठाणे आदींसह १२ केंद्रांतील स्पर्धकांची पुण्यामध्ये तळेगाव-दाभाडे येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. प्रत्येक संगीत प्रकारात एकूण ३६ स्पर्धकांतून विजेत्यांची निवड करण्यात आली. (प्रतिनिधी)