शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
2
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
3
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
4
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
5
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
6
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
7
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
8
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
9
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
10
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
11
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
12
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
13
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
14
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
15
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
16
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
17
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
18
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
19
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
20
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू

प्रस्तावित ऊस संशोधन केंद्र नापणेत, जागा कृषी विद्यापीठाच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 1:38 PM

sindhudurg, Pramod Jathar, Agricultural Science Center नापणे येथील १७ एकर शासकीय जागा अखेर नियोजित ऊस संशोधन केंद्र उभारणीसाठी दापोली कृषी विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यात आली. त्यामुळे ऊस संशोधन केंद्र उभारणीतील मोठा अडसर दूर झाला आहे. जागा हस्तांतरणामुळे आता या जागेत विद्यापीठाला आपल्या उपक्रमांना सुरुवात करता येणार आहे.

ठळक मुद्देप्रस्तावित ऊस संशोधन केंद्र नापणेत, जागा कृषी विद्यापीठाच्या ताब्यात प्रमोद जठारांच्या प्रयत्नांना यश, शेतकऱ्यांना होणार फायदा

वैभववाडी : नापणे येथील १७ एकर शासकीय जागा अखेर नियोजित ऊस संशोधन केंद्र उभारणीसाठी दापोली कृषी विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यात आली. त्यामुळे ऊस संशोधन केंद्र उभारणीतील मोठा अडसर दूर झाला आहे. जागा हस्तांतरणामुळे आता या जागेत विद्यापीठाला आपल्या उपक्रमांना सुरुवात करता येणार आहे.कोकणात ऊसाचे वाढते क्षेत्र लक्षात घेऊन येथील शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण उपलब्ध व्हावे या उद्देशाने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार भाजपचे तत्कालीन जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आमदार होण्याआधी नापणे येथे ऊस संशोधन केंद्र सुरू व्हावे, अशी मागणी शासनाकडे केली होती.

या ऊस संशोधन केंद्रासाठी नापणे येथील १७ एकर जागा मिळावी, अशी मागणी करून त्यासाठी गेली १२ वर्षे कृषी विद्यापीठ आणि राज्य शासन यांच्यातील दुवा म्हणून भूमिका निभावली. त्यामध्ये त्यांना अनंत अडथळे पार करावे लागले.गतवर्षी भाजप-शिवसेना युतीच्या तत्कालीन कृषीमंत्र्यांनी नापणे येथील नियोजित ऊस संशोधन केंद्राच्या जागेला भेट दिली. त्यानंतर तत्काळ त्यांनी ही जागा संशोधन केंद्राला मिळण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. त्यामुळे जागा हस्तांतरण प्रकियेला गती मिळाली.

या जमिनीचे मूल्यांकन २३ लाख ५२ हजार ९५८ इतके करण्यात आले. ही रक्कम डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाने महसूल विभागाकडे भरणा केली. त्यानंतर हा भूखंड विद्यापीठाकडे हस्तांतरण प्रकिया सुरू झाली. परंतु मार्चपासून कोरोनाच्या सावटात ही हस्तातंरण प्रकिया पूर्णत: मंदावली होती.ऊस संशोधन केंद्रासाठी नियोजित जागा विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी वैभववाडी तहसीलदारांना दिले होते. त्यानुसार तहसीलदार रामदास झळके यांनी फोंडाघाट संशोधन केंद्राचे विजय शेट्ये यांच्याकडे हस्तांतरण आदेशाची प्रत दिली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, किशोर जैतापकर, मंडळ अधिकारी पावसकर आदी उपस्थित होते. नापणेतील नियोजित जागेचे ऊस संशोधन केंद्रासाठी कृषी विद्यापीठाकडे झालेले हस्तांतरण ही जठार यांच्या गेल्या १२ वर्षांच्या प्रयत्नांची फलश्रुती आहे. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्गPramod Jatharप्रमोद जठारAgricultural Science Centerकृषी विज्ञान केंद्र