शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांना गंडवणारा सूत्रधार अटकेत

By admin | Updated: January 7, 2015 00:01 IST

दाभोळ ऊर्जा प्रकल्प : आतापर्यंत ५० लाखांची फसवणूक झाल्याचे उघड.

खेड : दाभोळ ऊर्जा प्रकल्पग्रस्तांची जमीन व्यवहारात आतापर्यंत ५० लाख रूपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर खेड तालुक्यातील संगलट येथे राहणाऱ्या अब्दुल्ला नाडकर याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. त्याला खेड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यापैकी अन्य दोघांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी विलास भोसले यांनी ही माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू असून, नाडकर याच्या अटकेमुळे अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत़ दाभोळ ऊर्जा प्रकरणात एकूण ५० लाखांपेक्षा अधिक फसवणूक झाल्याचे आतापर्यंत उघड झाले आहे. दाभोळ ऊर्जा प्रकल्पाअंतर्गत परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी दोषींविरोधात सक्त कारवाई करण्याची मागणी काही शेतकऱ्यांनी केली होती. शिवाय खेड पोलिसात ४ महिन्यांपूर्वी याप्रकरणी अब्दुल्ला नाडकर, त्याचा सहकारी किरण यशवंत जाधव (सुकिवली, खेड) व बद्रुद्दिन खोत (पोफळवणे, चिपळूण) यांच्याविरोधात काही शेतकऱ्यांनी फिर्याद दाखल केली आहे. या तिघांविरोधात खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी किरण आणि बद्रुद्दिन यांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे.अब्दुल्ला या आरोपीने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तो जिल्हा न्यायालयाने नामंजूर केला होता. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयानेही जामीन नामंजूर केल्यानंतर तो पसार झाला होता. या प्रकरणाचा तपास खेड पोलिसांकडून काढून घेण्यात आला होता आणि तो रत्नागिरी येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला होता.या विभागाने आरोपींची सर्व माहिती घेऊन आणि त्यांची पार्श्वभूमी लक्षात घेत कडक कारवाईचे संकेत येथील शेतकऱ्यांना दिले होते़ अखेर यातील अब्दुल्ला नाडकर याला मंगळवारी अटक करण्यात या विभागाला यश मिळाले आहे़ त्याला खेड येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला ७ दिवस पोलीसकोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)अशी झाली फसवणूकखाडीपट्ट्यातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी येथील दाभोळ ऊर्जा प्रकल्पासाठी संपादीत करण्यात आल्या आहेत़ अनेक शेतकऱ्यांची फळझाडे आणि बांधबंदिस्तांचे नुकसान झाले आहे, तर अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यात आल्याने त्यांनाही नुकसानभरपाई देण्यात आली आहे. मात्र, भरपाईचे धनादेश थेट शेतकऱ्यांच्या हाती पडलेच नाहीत, तर ते एजंट म्हणून वावरत असलेल्या तिघांच्या हाती पडल्याने शेतकऱ्यांना लुबाडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. निरक्षर असलेल्या या शेतकऱ्यांचे धनादेश दोघांनी परस्पर वटवले असून, धनादेशाच्या २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडली, तर ७५ टक्के रक्कम तिघांनी घेतल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.दोघांना अटकपूर्व जामीन, सूत्रधाराला अटकसात दिवसांची दिवसांची पोलीस कोठडीअनेक शेतकऱ्यांना फसविल्याची चर्चा.सूत्रधाराला ७ दिवसांच्या पोलिस कोठडी.कडक कारवाईचे पोलिसांनी दिले संकेत.