शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

काथ्या व्यवसायात आर्थिक सक्षमतेची ताकद : एम. बी. चौगुले

By admin | Updated: January 1, 2015 00:18 IST

वेंगुर्ल्यात काथ्या उद्योग जागृती प्रशिक्षण सुरू

वायंगणी : काथ्या व्यवसायापासून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून त्यांचे कुटुंब सक्षम बनविण्याची ताकद असणारा हा व्यवसाय काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेतून अविरतपणे सुरू आहे. याचा आदर्श प्रशिक्षणार्थ्यांनी ठेवून रोजगार निर्मिती करावी व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनावे, असे उद्गार वेंगुर्ले बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्रा. एम. बी. चौगुले यांनी काढले. वेंगुर्ले कॅम्प येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या सभागृहात भारत सरकारच्या सुक्ष्म-अतिसूक्ष्म विभाग क्वॉयर बोर्ड व महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने काथ्या उद्योग जाणीव जागृती या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. एम. बी. चौगुले यांच्या हस्ते झाले. यावेळी क्वॉयर बोर्डचे फिल्ड आॅफिसर शंकर नारायणन, संस्थेचे मार्गदर्शक एम. के. गावडे, मातोंड माजी उपसरपंच नितीन परब, दोडामार्ग जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंदू मुळीक, दीक्षा परब, महिला काथ्याच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, आदी उपस्थित होते. प्रज्ञा परब यांनी महिलांनी काथ्या व्यवसायातून रोजगार मिळू शकतो, त्याकरिता उद्योजक बनण्याचा संकल्प केला पाहिजे. शंकर नारायणन यांनी आज केरळ राज्य काथ्या व्यवसायातून अर्थव्यवस्था सांभाळते. काथ्यापासून दोरी मॅटबरोबरच अनेक उत्पादने निर्मिती केली जाते. तुम्हाला प्रशिक्षण कर्ज व बाजारपेठ क्वॉयर बोर्डच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल, असे सांगितले. (वार्ताहर)क्वॉयर बोर्डाच्या या प्रशिक्षणातून प्रशिक्षणार्थ्यांना काथ्या युनिट दिले जाणार आहे. यातून रोजगार निर्मिती केली जाईल. त्यांनी उत्पादित केलेल्या मालालाही बाजारपेठ मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे. मात्र, प्रामाणिकपणे व सचोटीने व्यवसाय केल्यास निश्चित यशस्वी उद्योजक बनाल.- एम. के. गावडे , मार्गदर्शक, काथ्या कामगार संस्था