शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी जनतेचे मित्र व्हावे : भोसले

By admin | Updated: January 13, 2015 00:14 IST

रेझिंग डे : विविध उपक्रमांमुळे परस्पर संबंध दृढ होतील असा विश्वास

मंडणगड : ‘रेझिंग डे’ निमित्ताने मंडणगड पोलीस स्थानकाच्यावतीने तालुक्यात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे पोलिसांबद्दल सर्वसामान्यांच्या मनात असलेले गैरसमज दूर होऊन, परस्परांतील संबंध अधिक दृढ होतील. त्याच्या फायदा पोलिसांचे कामकाज लोकाभिमुख होण्यास मदत होईल, असा विश्वास उपविभागीय पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी व्यक्त केला.पोलीस रेझिंग डेनिमित्त आयोजित बक्षीस वितरण सोहळ्याचा अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार संजय कदम, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, दलितमित्र दादासाहेब मर्चंडे, उपविभागीय पोलीस निरीक्षक विलास भोसले, तहसीलदार कविता जाधव, गटविकास अधिकारी अरुण जाधव, जिल्हा परिषद सदस्य अस्मिता केंद्रे, प्रकाश शिगवण, रामदास रेवाळे, रमेश दळवी, संतोष गोवळे, सचिन थोरे, सुलतान मुकादम, सरपंच महेंद्र सापटे, सुनीता जाधव डॉ. प्रभाकर भावठणकर, दीपक घोसाळकर उपस्थित होते. यावेळी भोसले म्हणाले की, नागरिकांनी पोलिसांचे डोळे बनून काम केल्यास दहशतवादासारखी जगाला भेडसावणारी समस्या क्षणात नष्ट होईल. नागरिकांनी पोलीस मित्र बनून एका जागृत व कर्तव्यनिष्ठ नागरिकाच्या भूमिकेत काम करणे गरेजेचे आहे. पोलीस दल स्थापना दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविले जात असताना, पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर यांच्या मार्गदर्शनाखील मंडणगड पोलीस स्थानकातील कर्मचारी व पोलीसपाटलांनी हा कार्यक्रम लोकाभिमुख केला. त्यामुळे जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कार्यक्रम मंडणगड पोलीस स्थानकाच्यावतीने राबवण्यात आला, असे म्हणताना कार्यक्रम राबवण्यासाठी मेहनत करणाऱ्या सर्व घटकांचे यावेळी कौतुक केले़ यावेळी दादा इदाते, आमदार संजय कदम, प्रकाश शिगवण, अस्मिता केंद्रे, सचिन थोरे यांनी मनोगत व्यक्त केले. पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर यांनी प्रास्ताविक केले. दयानंद कांबळे व सुनील घोसाळकर यांनी सूत्रसंचालन केले़ (प्रतिनिधी)